आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा‎ रूग्णालयात हलकल्लोळ:लसीकरणानंतर बाळ दगावले‎

धाराशिव‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेंटासह पाच प्रकारच्या लसी‎ दिल्यानंतर पावणेदाेन महिन्याच्या‎ बाळाचा मृत्यू झाल्याची घटना‎ तालुक्यातील जुनोनी येथे गुरूवारी‎ सकाळी घडली. यामुळे जिल्हा‎ रूग्णालयात हलकल्लोळ उडाला.‎ दरम्यान,राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत‎ गावातील सहा मुलांना लस देण्यात‎ आली. अन्य मुलांना काहीही त्रास‎ नाही. हा मृत्यू का झाला, याचा‎ तपास समिती करणार.

तसेच‎ शवविच्छेदन अहवालानंतर नेमके‎ कारण समोर येईल,असे प्रशासनाने‎ सांगितले.‎ जुनोनी येथील वैष्णवी व देविदास‎ कदम या दांपत्याच्या पावणेदोन‎ महिन्याच्या प्रसाद या बाळाला‎ गुरूवारी सकाळी गावातील प्रा.‎ आरोग्य केंद्रात रोगप्रतिबंधक‎ इंजेक्शनद्वारे पेंटा,आयपीव्ही आणि‎ पीसीव्ही ही लस देण्यात आली तर‎ तांेडाद्वारे ओपीव्ही आणि रोटा या‎ लसीची मात्रा दिली.

गावातील सहा‎ मुलांना लसी दिल्या. मात्र,प्रसाद‎ याला रिअॅक्शन आली.त्याला‎ जिल्हा रूग्णालयात आणल्यावर‎ डॉक्टरांनी मृत घोषित केले.त्यानंतर‎ कुटुंबियांना धक्का बसला. त्यानंतर‎ बाळाच्या नातेवाईकांनी जिल्हा‎ रूग्णालयात आक्रोश केला.‎ प्रशासनाने बाळाचे शवविच्छेदन‎ करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून‎ मृत्यू का झाला, याचे कारण समोर‎ येईल.गावातील एकूण ६ बालकांना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ लसी देण्यात आल्या होत्या. मात्र‎ अन्य मुलांना कोणत्याही प्रकारचा‎ त्रास नाही, असे आरोग्य प्रशासनाचे‎ म्हणणे आहे. यात नेमका काय‎ प्रकार घडला, याबद्दलची माहिती‎ मात्र कुणाला देता येत नव्हती.‎

अहवालानंतर कळेल‎
जुनोनी येथील बाळाचा मृत्यू‎ नेमका कशामुळे झाला, याचे कारण‎ शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर‎ कळेल. मात्र,चौकशी समितीकडून‎ उद्यापासूनच याची स्वतंत्रपणे‎ चौकशी केली जाईल.दोन दिवसांत‎ त्याचाही अहवाल येईल.‎ -डॉ.कुलदीप मिटकरी, जिल्हा‎ माता-बाल संगोपन अधिकारी‎

बातम्या आणखी आहेत...