आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच घेतना पकडले:लाचखोर ग्रामसेवकाला पकडले

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायरान जागेची नागरिकाच्या नावे नोंदीसाठी चार हजारांची लाच घेताना उस्मानाबाद तालुक्यातील कुमाळवाडी येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि. १९) दुपारी करण्यात आली. कुमाळवाडीतील एक व्यक्ती गायरान जमिनीवर घर बांधून वास्तव्यास आहे. त्याने ग्रामपंचायतीकडे जागा नावावर करण्यासाठी घरकुल योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज दिला होता.

मात्र, त्यांच्या अर्जावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे नागरिकाने ग्रामसेवक सुयज्ञ वशिष्ठ मैंदाड (४४) यांना संपर्क साधला. त्यांनी १० हजारांची लाच मागितली. त्या नागरिकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक विकास राठोड यांनी पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, उस्मानाबादचे पोलिस उपाधीक्षक प्रशांत संपते यांच्या र्मादर्शनात पोलिस अंमलदार इफ्तेकार शेख, मधुकर जाधव, विशाल डोके, सचिन शेवाळेंनी सापळा रचला. ग्रामसेवक मैंदाड यांना चार हजार लाच घेतना पकडले.

बातम्या आणखी आहेत...