आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबादच्या बसस्थानकाची इमारत खिळखिळी झाली असून तीन वेळा भूमिपूजन करूनही नवीन बांधकामाला मुहूर्त मिळालेला नाही. राजकीय व प्रशासकीय अनास्थेमुळे येथे इमारतीसाठी निधीही उपलब्ध झालेला नाही. यामुळे सुमारे ५० वर्षांपूर्वीची कालबाह्य झालेली इमारत वापरण्याची वेळ आली आहे. बसस्थानकाच्या आवारात तर थोड्याशा पावसाने चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. प्लॅटफार्मच्या दूर थांबलेल्या बस गाठण्यासाठीही प्रवाशांना कसरत करावी लागत आहे.
गेल्या दहा वर्षांपासून बसस्थानकाच्या नवीन इमारतीची मागणी होत आहे. परंतु, काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी, भाजप – शिवसेना युती व आताच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातही बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाविषयी अनास्था कायम आहे. याचा त्रास प्रवाशांसह बसच्या सुरू असलेली कामे दर्जेदार आणि विहित मुदतीत पूर्ण करावीत. यासाठी आवश्यक मदत करण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. जिल्हाध्यक्ष काळे यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी करू, असे सांगितले.
इमारत झाली खिळखिळी
गतवर्षीच पावसाळ्याच्या सुरुवातीला इमारतीच्या छताचा मोठा धपला पडला होता. सुदैवाने पहाटेच्या वेळी प्रवासी नसल्यामुळे अप्रिय घटना घडली नाही. असे अनेक ठिकाणी छत खराब झाले आहे. काही ठिकाणी तर पाऊस लागून राहिला तर गळतीही होते. प्रवाशांना थांबण्यासाठीही जागा मिळत नाही. काही वेळा तर इमारतीमध्ये असूनही प्रवाशांना छत्री घेऊन उभे राहावे लागते.
अन्य ठिकाणी दुसऱ्यांदा बसस्थानक
उस्मानाबादचे बसस्थानक ५० वर्षाचे आहे. याच्या नंतर तुळजापूरला बसस्थानक बांधण्यात आले आहे. तरीही तेथे दुसरे नवीन बसस्थानक उभे केले आहे. तसेच आताही जुने बसस्थानक पाडून तेथेच सुमारे सात कोटी रुपये खर्चून नवीन इमारत बांधण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. तसेच शेजारील तालुका औसा येथे नवीन इमारत झाली. मात्र, सक्षम लोकप्रतिनिधींचा सक्षम पाठपुरावा नसल्याने राज्य शासन उस्मानाबादकडे ढुंकंूनही पाहत नाही.
आताही केवळ डागडुजीचा प्रस्ताव
सध्या पक्की इमारत गरजेची असतानाही एसटी महामंडळाच्या विभागीय अभियंत्यांनी केवळ डागडूजीची प्रक्रिया केली आहे. यासाठी तीन लाख रुपयांचा प्रस्ताव असून वर्क ऑर्डरही झाली आहे. अशा मलमपट्ट्या सातत्याने करण्यात आल्या आहेत. मात्र, इमारतच इतकी जीर्ण झाली आहे की, याचा काहीही उपयोग होत नाही. तरीही केवळ डागडूजीवरच भर देण्यात स्वारस्य दाखवले जात आहे.
गैरसोय टाळण्यासाठी डागडुजी
सध्या निधीची अडचण असल्यामुळे बसस्थानकाचे बांधकाम मागे पडले आहे. हा वरिष्ठ स्तरावरचा प्रश्न आहे. परंतु, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी डागडूजी केली जात आहे. लवकरच आवाराचेही काम करण्यात येणार आहे. प्रवाशांना त्रास होऊ दिला जाणार नाही.
शशिकांत उबाळे, विभागीय अभियंता, एसटी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.