आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाब आम आदमी पार्टीच्या सरकारने जाणीवपूर्वक सुरक्षा काढून घेतल्याने दोन दिवसांत पंजाबी गायक काँग्रेस नेते सिध्दू मुसेवाला यांची हत्या झाली. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर हत्येचा निषेध करुन सुरक्षा हटवणारे पंजाब मुख्यमंत्री भगवंत मान यांचे प्रतिमेस जोडे मारून दहन करण्यात आले पंजाबच्या आम आदमी पार्टी सरकारने गायक कॉंग्रेस नेते सिध्दू मुसेवाल यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर मानसा येथे झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल केलेे होते. मुसेवाला यांना धमक्या येत असल्याने यापूर्वीच्या सरकारने त्यांना सुरक्षा दिली. आम आदमी पार्टीच्या सरकारने मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतली. दोनच दिवसांत गोळ्या झाडून त्यांची हत्या झाली. जाणीवपूर्वक सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप करत युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी (३०) सायंकाळी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, प्रदेश सचिव महालिंग बाबशेट्टी,पंस माजी सभापती सचिन पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश राठोड, माजी नगरसेवक महेश माशाळकर,पप्पू सगर, वसीम शेख, जिल्हा सचिव गौस शेख, शहराध्यक्ष आय्युब लदाफ, सोहेल इनामदार, रत्नदीप भालेराव, जीवन सरपे, बाबा मस्के, चंदू मजगे आदीसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.