आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचार थंडावणार:आज सायंकाळी 5 वाजता प्रचार थंडावणार

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठ दिवसापासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी ५ वाजता थांबणार आहे तर रविवारी (दि.१८) प्रत्यक्ष मतदान होणार आहे. दरम्यान मतदानाचे साहित्य पोहोचवण्यासाठी एसटी बस आणि खासगी वाहनाची मदत घेण्यात येत असल्याचे निवडणुक विभागाने कळवले आहे. जिल्ह्यातील १६६ ग्रामपंचायतीच्या निवडणूक सुरू असून १६ डिसेंबर रोजी सायंकाळी प्रचार थंडावणार आहे.

काही ग्रामपंचायतीचे सरपंच तर काही ग्रामपंचायतीतील सदस्य बिनविरोध निवडी झाल्या आहेत. तुळजापूर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम मुदतीनंतर तालुक्यातील मसला खुर्द, वडगाव लाख आणि खुदावाडी ग्रामपंचायतचे सरपंचपद बिनविरोध निवडून आले आहेत.

या शिवाय सदस्यांचा ४१ जागा बिनविरोध निघाल्या आहेत. गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेला जाहीर प्रचार शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता थांबणार आहे. यानंतर प्रत्यक्ष गाठी भेटीला वेग येणार आहे. दरम्यान मतदान साहित्य शनिवारी (दि.१७) मतदान केंद्राकडे रवाना होणार आहे. मतदान साहित्य वितरणासाठी २५ टेबलची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.

मतदानाचे साहित्य पोहोचवण्यासाठी १८ एसटी बस आणि ४ खाजगी जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. तुळजापूर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीमध्ये मसला येथील सरपंच पदासह २ प्रभाग बिनविरोध निवडून आले आहेत. या शिवाय देवसींगा तुळ व बोरी येथील प्रत्येकी १ प्रभाग बिनविरोध निवडून आला आहे.

बातम्या आणखी आहेत...