आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला कैदी, महिला रुग्णालयातील रुग्ण तसेच परिचारिका आणि वसतीगृहातील मुलींशी संवाद साधून राज्य महिला आयोगाच्या सदस्या अॅड. संगीता चव्हाण यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यात सोमवारी आलेल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर सिटी पोलीस स्टेशन येथील भरोसा सेल येथे भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत प्रभारी पोलीस अधीक्षक नवनीत कावत, महिला व बालविकास अधिकारी एस. व्ही. अंकुश आदी उपस्थित होते. छोट्या छोट्या कारणांसाठी पती पत्नी यांच्यातील वाद विकोपाला जाऊन त्यांचे संसार उद्धवस्त होतात. अशा जोडप्यांचा संसार सुखात चालवावे म्हणून पोलीस प्रशासनाने केलेले हे कार्य अभिनंदनास पात्र आहे.तसेच स्त्रियांवर होणारे अत्याचार, घरात मिळणारी वाईट वागणूक आणि घरेलू हिंसाचारावर आळा घालण्यासाठी हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे, असे मत ॲड. चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.
ॲड.चव्हाण यांनी जिल्हा स्त्री रुग्णालय येथे भेट देऊन महिला रुग्णांची विचारपूस केली. रुग्णालयातील सर्व विभागांचे निरीक्षण केले. येथील परिचाराकांशी चर्चा केली आणि त्यांना उद्भवत असलेल्या समस्या जाणून घेतल्या.
गरम पाण्यासाठी सुविधा नसल्याने नाराजी
चव्हाण यांनी यावेळी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मुलींच्या वस्तीगृहासही भेट दिली. ॲड. चव्हाण यांनी मुलींना पिंक बाक्स आणि पिंक मोबाईल तसेच ११२ क्रमांकाबाबत सूचना केल्या. वसतीगृहात काही ठिकाणी गरम पाण्यासाठी गीझर उपलब्ध नसल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. याकडे तात्काळ लक्ष देऊन ते उपलब्ध करावा आणि सॅनेटरी पॅडस तसेच इतर अनुषांगिक औषधी वस्तीगृहात उपलब्ध करून द्यावेत. अशा सूचनाही ॲड.चव्हाण यांनी केल्या. काहींच्या प्रश्नाना उत्तरेही दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.