आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाव आदर्श होण्यासाठी प्रत्येकाला योगदान देण्याची गरज:माझं गाव प्रतिष्ठान ही संकल्पना राज्यभर आदर्श निर्माण करेल ; शेटे

बार्शी9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत गावातील विकास व सांस्कृतिक चळवळीला चालना देण्यासाठी जागरूक नागरिकांनी पुढाकार घेत ‘माझं गाव प्रतिष्ठान, वैराग या संस्थेची स्थापना केली आहे. हे प्रतिष्ठान राज्यातील ग्रामीण भागात आदर्श निर्माण करेल, असे मत डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्त केले. ते माझं गाव प्रतिष्ठानच्या व श्री संतनाथ महाराज अन्नछत्रालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

शेटे म्हणाले, गावातील जाणकार मंडळींच्या मार्गदर्शनाखाली सजग व गावाप्रती तळमळ असलेल्या तरुणांनी या सुंदर संकल्पनेला मूर्त स्वरूप देत आज आदर्श उपक्रम सुरू केला. यात अबालवृद्ध व महिलांना योग्य स्थान देत चळवळीत सहभागी करून घेतले आहे. गाव आदर्श होण्यासाठी प्रत्येकाला योगदान देण्याची गरज असल्याची जाणीव असलेल्या पदाधिकाऱ्यांनी संतनाथ अन्नछत्र योजना सुरू करून यापुढेही प्रतिष्ठान लोकोपयोगी उपक्रम राबवणार असल्याचे दाखवून दिले आहे. आपले गाव सुंदर, स्वच्छ व आदर्श करण्यासाठी माझे गाव प्रतिष्ठानद्वारे सुरू झालेली ही चळवळ काही दिवसांत व्यापक झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.वैरागची कन्या व जय मल्हार मालिकेतील ‘बानू’चे पात्र साकारलेली अभिनेत्री ईशा केसकर या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...