आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमोल्लंघन:मानाच्या पालखीची बांधणी पूर्ण ; नवरात्रोत्सवासाठी तीर्थक्षेत्र तुळजापूरकडे प्रस्थान

तुळजापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन सोहळ्यातील मानाच्या पालखीची बांधणी व सजावट पूर्ण झाली. रविवारी नगर जिल्ह्यातील राहूरी येथील पालखी मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. पालखीचे १० सप्टेंबरला नवरात्रोत्सवासाठी तीर्थक्षेत्र तुळजापूरकडे प्रस्थान होईल. पालखीचे तुळजापुरात ४ ऑक्टोबरला आगमन होणार आहे. तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला. सीमोल्लंघन सोहळ्यातील पालखीचा मानकऱ्यांनी पालखीची बांधणी व सजावट पूर्ण केली आहे. पालखी नगर जिल्ह्यातील राहूरी येथील पालखी मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. यावेळी मुख्य मानकरी सागर भगत, ज्ञानेश्वर भगत, शिवराम भगत, संदीप भगत, देविदास भगत, मंगेश भगत, नीलेश भगत, सुरेंद्र भगत, वसंत भगत यांच्यासह पालखी तयार करणारे सुतार - सुनील पवार व पालखी तयार करणारे लोहार - राजू रणसिंग, गोरख रणसिंग, अमोल रणशिंग आदींची उपस्थिती होती. नवरात्र महोत्सवासाठी बुऱ्हाणनगर येथील पालखीचे ११ सप्टेंबरला तुळजापूर कडे प्रस्थान होईल. तत्पूर्वी ०४ सप्टेंबरला पालखी तयार होऊन राहुरी येथून बुऱ्हाणनगर येथे आगमन होईल. तर ०४ ऑक्टोबरला सायंकाळी पालखीचे तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे आगमन होणार आहे. सीमोल्लंघन सोहळ्यात बुऱ्हाणनगरच्या पालखीचा मान आहे.

बातम्या आणखी आहेत...