आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपूर्णच:आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे  बांधकाम दीड वर्षानंतरही अपूर्णच

काक्रंबाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील काक्रंबा गावातील आरोग्य उपकेंद्राची सध्याची इमारत कालबाह्य झाल्याने जिल्हा परिषदेने सन २०२० मध्ये नवीन इमारत बांधकामासाठी लाखो रुपये निधी खर्च करून सर्व सोयी सुविधा युक्त अशा उपकेंद्राच्या इमारतीचे काम गेली दीड वर्षापासून करण्यात येत आहे. मात्र बाधकामाची मुदत संपून कंत्राटदाराने ना मुदतवाढ घेतली ना काम पूर्ण केले. गेली दीड दोन महिन्यापासून हा कंत्राटदार अर्धवट काम सोडून गायब झाल्याने उपकेंद्र इमारतीचे बाधकाम पूर्ण होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तुळजापूर तालुक्यातील नऊ ते दहा हजार लोकसंख्येच्या काक्रंबा गावात सध्या असलेली आरोग्य विभागाची इमारत ही धोकादायक आहे. या उपकेंद्रा अंतर्गत काक्रंबा,काक्रंबावाडी,मोर्डा,तडवळा,हंगरगा तुळ व हंगरगा पाटी आदी सहा गावातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा मिळविण्यासाठी बारा महिने रात्री अपरात्रीच्या वेळेस तुळजापूर अथवा उस्मानाबादला खाजगी दवाखान्याची पायरी चढावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन तात्कालीन सरपंच जोतिराम वाघमारे,निर्मला झाडे,पुतळाबाई मदने यांच्यासह जि.प.सदस्य बालाजी बंडगर यांनी ठरावाद्वारे पाठपुरावा करून काक्रंबा गावासाठी आरोग्य उपकेंद्राची नव्याने इमारत बांधकाची मागणी लावून धरली. जिल्हा परिषदने काक्रंबा उपकेंद्र इमारत बाधकामासाठी ८६ लाख ८४ हजार रुपये निधी मंजूर केला. उमरगा येथील कंत्राटदाराने काम मिळविण्यासाठी आॅनलाईन पद्धतीने तब्बल १४% दराने टेंडर भरुन ८६ लाख ८४ हजार रुपये रुपयेचे काम अवघ्या ७५ लाख ७४ हजारात घेतले. त्यामुळे कामाच्या दर्जा बाबत शंकाच असून सदरील काम चालू करण्यासाठी दि २७ जानेवारी २०२१ रोजी कार्याभर आदेश देऊन सदरील उपकेंद्राचे काम ३१ मार्च पर्यत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र काम सुरू होवून तब्बल दीड वर्षाचा कालावधी लोटला असताना देखील अद्याप काम पूर्ण केले नाही.

काक्रंबा येथे सोयी सुविधासह नव्यानं उभारण्यात येत असलेल्या आरोग्य उपकेंद्र इमारत बाधकाम सुरू होवून तब्बल दीड वर्षे झाले आहेत कंत्राटदार यांची मुदत संपली आहे गेली दीड महिना झाला कंत्राटदार अर्धवट काम सोडून गायब झाल्याने या त्याला काळया यादीत टाकण्याची मागणी होत आहे.गावात राहणाऱ्या नागरिकांना आरोग्यासारखी मूलभूत सुविधा मिळणे महत्वाचे आहे. ती मिळण्यासाठी प्रशासनाने हे काम मनावर घेण व रूग्णालय सुरू करणे गरजेचे आहे. हे काम अर्धवट का ठेवले गेले, याचा कंत्राटदाराने खुलासाही करणे आवश्यक आहे.

कंत्राटदार दाद देत नाही
या बाबत बाधकाम उपविभाग तुळजापूर चे शाखा अभियंता बी.एल.वाघमारे यांना विचारले असता ते म्हणाले की, कंञाटदाराने दि. २२ सप्टेंबर पर्यत मुदत वाढ घेतली. परत मात्र तो फिरकला नाही. या पूर्वी त्याला दंड लावण्यात आला असून काम वेळेत पूर्ण करण्या लेखी तोंडी स्वरुपात सूचना दिलेल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...