आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:बियाणे, खतांचा खर्च हाताबाहेर, मशागत, आंतरमशागतीचा खर्चही अधिक; खर्चाच्या तुलनेत शेत मालास दर नसल्याने बळीराजा त्रस्त

अणदूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकेकाळी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे म्हटले जायचे. परंतु आता जागतिकीकरणाच्या रेट्यात सगळे उलटे झाले आहे. शेतीच्या मशागतीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च अवाढव्य वाढला आहे. त्या तुलनेत शेती उत्पादनास बाजारात भाव मिळत नाही. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने बळीराजा कंटाळला आहे. मागील दोन वर्षात खते, बियाणे, औषधांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. पेरणीपूर्व मशागतीसाठी नांगर, मोगडा, कुळव आदीचे दर भरमसाठ वाढले आहेत. पेरणीपूर्व मशागतीसाठी एकरी किमान सात हजार रुपये खर्च येत आहे. त्यानंतर पेरणीचा खर्च व आंतरमशागत, पिकाला पाणी देणे, त्यानंतर काढणीच्या खर्चाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

उत्पन्नाचे अन्य साधन नाही, अवस्था बिकट
निव्वळ शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतीपूरक दुधाचा जोडधंदाही घसरणीला आला आहे. वैरणीसह पशुखाद्याचे भाव कडाडले आहेत. गुराखी मिळेनासे झाले आहेत. या परिस्थितीत लाखोंच्या शेतजमिनीवर कर्जासाठी बँकांमध्ये हेलपाटे मारल्यानंतर तुटपुंजे कर्ज देऊन बोळवण आहेत. त्यामुळे खासगी सावकारांशिवाय पर्याय राहत नाही. शेतकरी कर्जात जन्मतो व कर्जात मरतो, अशी अवस्था झाली आहे.

मागील दोन वर्षात खते, बियाणे, औषधांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. पेरणीपूर्व मशागतीसाठी नांगर, मोगडा, कुळव आदीचे दर भरमसाठ वाढले आहेत. पेरणीपूर्व मशागतीसाठी एकरी किमान सात हजार रुपये खर्च येत आहे. त्यानंतर पेरणीचा खर्च व आंतरमशागत, पिकाला पाणी देणे, त्यानंतर काढणीच्या खर्चाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेती करण्यापेक्षा मजुरी बरी या मानसिकतेत शेतकरी आला आहे. अनेक शेतकरी मजुरीकडे वळले असून बैल बारदाना असलेली मंडळीही शेती कामासाठी रोजंदारीवर चालल्याचे दिसून येत आहे. शेतकरी टिकेल तरच शेती पिकेल हे सत्य नाकारता येणार नाही.

मजुरांची वानवा
पेरणी ते काढणी इतकेच नव्हे तर बाजारात शेतमाल जाईपर्यंत मजुरांची गरज असते. आज मजुरी प्रचंड वाढली आहे. तरुण वर्गाचा कल शहरांकडे वाढल्याने मागेल तितकी मजुरी देवूनही वेळेवर मजूर मिळत नाही. यासोबतच अतिवृष्टी, अवर्षण, रोगराई, हमीभावाचा अभाव, बेभरवशाचा बाजारभाव, विजेचा लपंडाव आदी अडचणींना तोंड देतना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत.

वाहने, डिझेल दरवाढ, मशागत परवडेना
आधुनिक तंत्रज्ञान आल्याने अनेक शेतकऱ्यांनी बैल बारदाना काढून टाकला. शेतातील जनावरे नाममात्र उरली. आता ट्रॅक्टर, जेसीबी, वाहनाचे दर प्रचंड वाढले. डिझेल वाढल्याने आम्हाला भाव वाढवावे लागत असल्याचे वाहनमालक सांगतात. डिझेलच्या दरात ४-५ रुपये दरवाढ झाल्यास मशागतीसाठी एकरी ५०० रुपये वाढवतात, हे शेतकऱ्यांना परवडत नाही. गेल्या दोन वर्षात मशागतीचा खर्च दीडपटीने वाढला.

बातम्या आणखी आहेत...