आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदत:अनुकंपा नोकरीवरील कर्मचाऱ्याचा मृत्यू; पं.स. कर्मचाऱ्यांची आर्थिक मदत

उमरगा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील जहागिरदारवाडी येथील समाधान राठोड या युवकाला वडिलांच्या निधनानंतर उस्मानाबाद पंचायत समिती गटशिक्षण कार्यालयात अनुकंपावर नोकरी मिळाली होती. परंतु समाधानचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. समाधान राठोड चार महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. त्यांचा सेवा कार्यकाळ चार महिने अत्यल्प असल्याने शासकीय मदत मिळणे शक्य नाही.

त्यामुळे राठोड यांच्या कुटुंब आर्थिक अडचणीत आले. जिल्हा परिषदेचे सीईओ राहुल गुप्ता यांनी राठोड कुटुंबास आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत उमरगा पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी ५०० रुपये संकलित करुन २१ हजार रुपये जमा केले. ही रक्कम जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेकडे पाठवण्यात आली. यासाठी उमरगा पंचायत समितीचे कर्मचारी नंदू पवार, बी. एम. पवार, आर. बी. कांबळे आदींनी पुढाकार घेतला.

बातम्या आणखी आहेत...