आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभूकंपग्रस्त भागातील समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पुढाकार घेतला असून यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत नागरिकांनी सादर केलेल्या तक्रार, मागण्या, निवेदने विचारात घेऊन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता भारत शिंगाडे, पुनवर्सन विभागाच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, उपविभागिय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे, संतोष रुईकर आदी उपस्थित होते.
बैठकीत उमरगा तालुक्यातील तुगाव येथील अंतिम निवाड्यात नाव असलेले तथापी यादीत नाव नसलेल्यांना भुखंड देण्यासाठी अभिलेखे तपासणी करून अहवाल देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली. तसेच तेथील पुनवर्सन टप्पा क्र. ३ मध्ये नागरी सुविधा उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने तसेच विद्युत जोडणी स्थळपाहणी करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच तुगाव येथील बसस्थानक व अन्य शासकीय भूखंडांवर अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मांजरा प्रकल्पामुळे कळंब तालुक्यातील लोहटा, पिंपळगाव (टो), हिंगणगाव, सावरगाव काळे येथील शेतात पाणी शिरत आहे. यामुळे येथे भूसंपादनाची प्रक्रिया करण्याचे आदेश दिले. तुळजापूर तालुक्यातील केरूर येथे पळस निलेगाव प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना भूखंड मालकीचे प्रमाणपत्र देण्याबाबत सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.