आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून शेतकरी, महिला, वंचित, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. याचा जिल्ह्यालाही मोठा फायदा होणार आहे, असा दावा भाजपचे प्रवक्ते किशोर शितोळे यांनी केला. पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, अॅड. खंडेराव चौरे, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, प्रदीप शिंदे उपस्थित होते.
शितोळे म्हणाले, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी दोन महिने अगोदर जनतेकडून अपेक्षा व सूचना मागवण्यात आल्या होत्या. अडीच हजार सूचना प्राप्त झाल्या होत्या. खरीप व रब्बी हंगामातील पीकविमा सरकार भरणार असून शेतकरी वाटा फक्त एक रूपया असेल. मागेल त्याला शेततळे, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहान, कडधान्यावर आधारित प्रकल्प, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना आता सरकारमार्फत राबवली जाणार आहे. गो-सेवा संवर्धनासाठी तरतूद केली आहे. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी एक हजार कोटींची तरतूद केली.
मराठवाडा-कृष्णा सिंचन प्रकल्पासाठी ११ हजार ६२६ कोटींची तरतूद, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पासाठी तरतूद केली. नवीन २७ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. सोलापूर-तुळजापूर-धार ाशिव रेल्वे मार्गासाठी ४५० कोटी, धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधकामासाठी तरतूद केली आहे. नवीन नागपूर-गोवा महामार्ग जिल्ह्यातून जाणार, यासाठी मोठी तरतूद केली. याशिवाय रिक्षाचालक-मालक, गुरव, रामोशी, वडार समाजासाठी नवीन महामंडळे स्थापन केली आहेत. पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.