आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनाकारण मनस्ताप:नालीच्या स्लॅबला पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा भगदाड ; वाहने अडकण्याच्या घटना वाढल्या

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पोलिस मुख्यालय ते पाटबंधारे विभागाकडे जाणाऱ्या रोडवर पोलिस मुख्यालयासमोरील नालीवरच्या स्लॅबला १५ दिवसांत दुसऱ्यांदा भग्दाड पडले. पाटबंधारे विभाग, आनंदनगर, समता नगरात जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. रात्री नालीवरील स्लॅबचे भगदाड दिसत नसल्याने टर्न घेताना वाहनांचे चाक अडकते.

शहरासह अनेक हद्दवाढ भागात पालिकेने रस्ते व नालीची सोय केली. ऐन दिवाळीत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने ऑक्टोबरमध्ये स्लॅबवरील भगदाड बुजवले होते. मात्र, स्लॅबचे काम करताना स्टिलसह सिमेंटचा योग्य वापर केला नाही. परिणामी स्लॅबला अवघ्या १० ते १५ दिवासंत पुन्हा भग्दाड पडले आहे. शुक्रवारी (दि.४) एका दुचाकीचालकाची दुचाकी अडकून दुचाकीचालक पडला होता. त्यांनतर शनिवारी (दि.५) रात्री उशीरा चारचाकी कार टर्न घेताना अडकली होती. यासह अनेक वाहनांना धोका झाला आहे. यामुळे नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला आहे. नागरिकांची सोय करण्यासाठी पालिकेने तत्काळ स्लॅबवरील भगदाड बुजवावे. याबाबत काही वाहनधारकांनी पालिकेत तोंडी तक्रारी सुद्धा केल्या आहेत.

तातडीने दुरुस्ती हाईल
वाहनधारकांसह नागरिकांचा धोका दूर करण्यासाठी तातडीने नालीचा स्लॅब दुरुस्त करणार. काही दिवसांपूर्वी स्लॅबची दुरुस्ती केली होती. मात्र, किवरिंग होण्यापूर्वीच अवजड वाहनांची ये-जा झाली. यामुळे पुन्हा स्लॅब फुटला आहे.
-हरिकल्याण यलगट्टे, मुख्याधिकारी, उस्मानाबाद पालिका.

बातम्या आणखी आहेत...