आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुराळा:आपसिंगा, काक्रंब्यासह 50 ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकीचा उडणार धुराळा

तुळजापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी कालावधीत तालुक्यातील आपसिंगा, काक्रंबा, सलगरा मड्डी आदी ५० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा धुराळा उडणार असून ५० ग्रामपंचायतीच्या प्रभागांची आरक्षण सोडती नुकतीच काढण्यात आली आहे. दरम्यान येत्या २२ जुलै राेजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार असून त्या नंतर कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, ऐन पावसाळ्यात ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार आहे. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने चालवली आहे. या अनुषंगाने सोमवारी (दि.६) प्रभागाचे आरक्षण काढण्यात आले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी आरक्षण वगळून केवळ अनुसूचित जाती व सर्व साधारण महिलेसाठी आरक्षण काढण्यात आले. या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी यापूर्वीच आरक्षण काढण्यात आले आहे. सरपंच पद तसेच प्रभाग आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केल्याने ग्रामीण भागातील राजकारण तापू लागले आहे. तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी १४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रारूप मतदार यादीवर १४ जुलै ते १७ जुलै या कालावधीत हरकती स्विकारण्यात येणार आहेत तर २२ जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. मतदार यादी प्रसिद्धी संगणक प्रणालीद्वारे होणार असल्याचे निवडणूक विभागातून सांगण्यात आले आहे. गावागावात तापणार राजकीय वातावरण आगामी कालावधीत तुळजापूर, नळदुर्ग नगर पालिकेसह कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या सोबतच तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होणार असल्याने राजकीय वातावरण तापणार आहे.

निवडणूक जाहीर झालेल्या गावामध्ये कामठा, दीपक नगर, आपसिंगा, चव्हाणवाडी, चिवरी, दहिटना, गुळहळ्ळी, हंगरगा तुळ, कार्ला, काटी, केमवाडी, खुदावाडी, मानेवाडी, नंदगाव, निलेगाव, सांगवी मार्डी, सावरगाव, तीर्थ बु., वडगाव लाख, बोरी, बोळेगाव, बोरनदवाडी नळ, चिकुंद्रा, देवसिंगा नळ, धोत्री, होनाळा, काक्रंबा, केशेगाव, माळुंब्रा, मसाला खु., मुर्टा, उमरगा चिवरी, सलगरा मड्डी, वानेवाडी, आरबळी, गंजेवाडी, देवसिंगा तुळ, ढेकरी, गुजनूर, जळकोटवाडी सा., काटगाव, खंडाळा, कुन्सावळी, लोहगाव, मोर्डा, पांगरदरवाडी, सांगवी काटी, सारोळा, वागदरी, शिरगापूर आदी गावांचा समावेश आहे.याकडे सर्वांचे लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...