आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत:शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिव; अणदूर जिल्हा परिषद शाळेमध्ये रांगोळीच्या पायघड्या टाकून केले विद्यार्थ्यांचे स्वागत

अणदूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्रा.शाळा व कन्या शाळेच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी (बुधवारी) शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक सजावटीसह भव्य रांगोळी काढण्यात आली होती. सकाळी नवागत विद्यार्थ्यांची सजवलेल्या ट्रॅक्‍टर व बैलगाडीतून हलगी,लेझीम व टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांचा प्रवेश, जि.प. शाळा व वृक्ष संवर्धनाच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले तर या मिरवणुकीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.

शाळा पूर्वतयारी क्रमांक २ मेळावा तसेच २०२२ मधील नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात बुधवार, दि. १५ रोजी झाली. यात जिप केंद्रीय प्रा. शाळा व कन्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते. मिरवणुकीनंतर कन्या शाळेच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अणदूर बीटचे विस्ताराधिकारी तात्यासाहेब माळी हे होते. श्रीमती काटीकर मॅडम समग्र शिक्षा अभियान समन्वयक जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्यासह मुख्याध्यापक यशवंत मोकाशे व पवार, शिक्षकवृंद प्रतिभा सगरे, शोभा पाटू, शोभा बिराजदार, सुनीता देशमुख, अंजना पापडे, अमोल कांबळे तसेच केंद्रीय शिक्षक स्टाफ विमल राठोड, सुरेखा क्षीरसागर, मंजिरी जेटीथोर, रेणुका डोंगरे आदींची उपस्थिती होती. या वेळी शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. पाटू मॅडम यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...