आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाअधिवेशन:जिजाऊ ब्रिगेडचे पहिले राज्यव्यापी ग्रामीण महाअधिवेशन पिंपळनेरला ; जिल्ह्यातून ‘ब्रिगेड’च्या शेकडो महिला जाणार

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे जिल्ह्यात पिंपळनेर येथे जिजाऊ ब्रिगेडचे पहिले राज्यव्यापी ग्रामीण महाअधिवेशन होणार असून सोहळ्यात शनिवारी (दि.४) जिजाऊ पालखी सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या अधिवेशनात जिल्ह्यातील महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष आशाताई मोरजकर, कार्याध्यक्षा सुनंदा माने यांनी केले. महाअधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शोभायात्रेत आबालवृद्धांसह महिला, तरुणींद्वारे ग्रंथदिंडीसह शिवकालीन शस्त्रकला, विविध सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले जाणार आहे. शोभायात्रा मार्गावर विविध संस्थांकडून रांगोळ्या काढल्या जाणार आहेत. मुख्य बाजारपेठेतून मार्गस्थ होवून अधिवेशनस्थळी दमंडकेश्वर लॉन्सवर शोभायात्रेचा समारोप होईल. रात्री सात लोककलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. लावणी, गोंधळ, भारूड, गवळण, नाटिका सादर होईल.रविवारी (दि.५) सकाळी औरंगाबाद जिजाऊ ब्रिगेड महिलांचा शाहिरी जलसा कार्यक्रम होणार आहे. सकाळी १० वाजता उद्घाटन सत्र सुरु होईल. त्यानंतर महिलांना ‘ग्रामीण अर्थशास्त्र आज आणि उद्या’ या विषयांतर्गत महिलांसाठी बचतगटांसह, उद्योजक व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन होईल.

बातम्या आणखी आहेत...