आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील छञपती संभाजीराजे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री ञिवेणीबाई मोरे कनिष्ठ महाविदयातील शिक्षक विरूद् संचालक मंडळाच्या पदधिका-याचा वर्षंभरा पासुन सुरू असलेला अंतर्गत वादामुळे सदरील २०% अनुदान अडकले असून गेल्या दहा ते बारा वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सध्या उपासमारीची वेळ आल्याने सदरील संस्थेच्या कारभाराची चौकशी करून न्याय द्यावा अन्यथा दि ६ रोजी जि.प.च्या माध्यमिक शिक्षण कार्यालय समोर विद्यार्थीसह सहकुटुंब उपोषण करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी शिक्षण उपसंचालक व शिक्षण अधिकारी यांना निवेदन द्रारे दिला आहे.
तालुक्यातील काक्रंबा येथील शैक्षणिक क्षेत्रात नांवलैवकिक असलेल्या छत्रपती संभाजीराजे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री ञिवेणीबाई मोरे कनिष्ठ महाविदयात इयत्ता अकरावी बारावीच्या वर्गात काक्रंबा गावासह परिसरातील तब्बल ११४ मुलं मुली शिक्षण घेत अाहेत.
बारावी ची बोर्ड परिक्षा तोंडावर आलेली असताना महाविद्यालयातील सह शिक्षक व सचिवा मध्ये गेले दोन वर्षभरापासून सुरू असलेला अंतर्गत वाद काही केल्याने संपुष्टात येत नसल्याने या अंतर्गत वादाचा फटका विद्यार्थ्यांसह या ठिकाणी गेली दहा ते बारा वर्षांपासून विनावेतन काम अध्यापन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला आहे.
त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. मातोश्री त्रिवेणीबाई मोरे महाविदयालयस सन २०२० मध्ये शिक्षण विभागाकडून २०%अनुदान मंजुरी मिळाले असून त्यावरून संस्था सचिव व सहशिक्षक यांच्यात विविध कारणांमुळे अंतर्गत वाद उफळून आला आहे. दोन वर्षांपासून सतत तक्रारी सुरू आहेत. त्यामुळे सदरील २०%अनुदान संस्थेच्या अंतर्गत वादांत अडकले आहे. मात्र याचा नाहक त्रास दहा बारा वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या कर्मचारी तसेच विद्यार्थी यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली.
शिक्षणाचा खेळखंडोबा
संस्थेने शिक्षक कर्मचाऱ्यांचे हजेरी रजिस्टर गायब केले असून वारंवार मागणी करूनही दिले जात नसल्याचा आरोप करत तुम्ही बोगस शिक्षक असल्याच्या धमक्या दिल्या जात अाहे. या प्रकरणी शिक्षण विभागाकडे तक्रारी करून देखील दखल घेतली जात नाही.मात्र याप्रकरणी मुग गिळून गप्प बसलेले शिक्षण विभाग काय कारवाई करणार याकडे शिक्षक विद्यार्थी पालकांचं लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.