आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडोंजा येथील ग्रामपंचायतवर प्रशासक असल्यामुळे अनेक विकासात्माक कामांना खीळ बसली असून समस्या वाढल्या आहेत. प्रशासनाच्या उदासीनतेमूळे ग्रामसेवकाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
गावातील स्वच्छतेला पायबंद घालण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीचे अनेक निर्णय घेतले असून त्यामध्ये कचरा विल्हेवाट, आठवडी बाजार स्वच्छता व तुंबलेल्या गटाराचे नियंत्रण असे असले तरी डोंजा ग्रामपंचायत मात्र, याबाबत उदासीन असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे डोंजा गावात गावकरी यांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. साथीच्या आजाराचा फैलाव होवू नाही यासाठी ग्रामपंचायतने पावसाळ्यागोदर गटार स्वच्छता करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांचे पथक नेमून गावातील विकास कामांना सुरू करण्याची कारवाई करायला पाहिजे.
परंतु अशा कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना डोंज्यात राबविल्या जात नसल्याचे चित्र आहे.पावसाळ्यात संसर्गाचा प्रकोप होऊ नये म्हणून गावात सर्वत्र स्वच्छता करणे आवश्यक असतानाही याबाबीकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थानचा आरोप आहे.केवळ मुख्य चौकात स्वच्छता राबविल्या जाते. गल्ली बोळीत घाण कचरा तसाच पडून असतो. नाल्याची नियमीत स्वच्छता होत नाही.
ग्रामपंचायत सदस्य रणजित सूर्यवंशी म्हणाले की, गावातील अनेक भागातील नाल्या गाळाने भरल्या आहेत त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर वाहत असून डासांची उत्पत्ती वाढत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ग्रामपंचायत प्रशासन केवळ कागदोपत्रीच उपाययोजना राबवित आहे.उन्हाळयात ही स्थिती असेल तर पावसाळयात काय होईल असा प्रश्न विचारला जात आहे.
कायमस्वरूपी सरपंच नाही, यामुळे कामाचा बोजवारा
ग्रामपंचायत मध्ये कायमस्वरुपी सरपंच नसल्याने सर्व योजनेचा बोजवारा उडाला आहे. डोंजा स्वच्छता मोहीम थातुर मातूर राबविल्या जात आहे.देखावा म्हणून मुख्य चौक बाजार व रस्त्यावरच साफसफाई केल्या जात आहे. गेल्या कितेक महिन्यापासून ग्रामपंचायतला कायमस्वरुपी सरपंच नाही.डोंजा ग्रामस्थानचा कुठलाही वचक कर्मचाऱ्यांवर नसल्याचे दिसून येत आहे. गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन गंभीर नाही. पावसाळयात काय होणार याची चिंता आतापासूनच आहे.
तारामती सिरसट , ग्रा. सदस्य डोंजा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.