आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादरवर्षी जवळपास एप्रिल महिन्यानंतर गावखेड्यातील कूलर सुरू करण्याकडे नागरिकांचा कल असतो. मात्र, यावर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागल्याने अडगळीत पडलेले कूलर दुरुस्तीकरिता नागरिकांची लगबग वाढली आहे. एरव्ही मे महिन्यात उष्णतेची सर्वांत जास्त झळ बसत असते. मात्र, मागील काही वर्षांपासून ईटसह परिसारातील तापमानात सातत्याने वाढ हाेत असल्याचे दिसून येत आहे. यातही मार्च महिन्यातच उन्हाची काहिली जाणवण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी जवळपास मे-जून महिन्यांत तापमान अगदी शिगेला पोहोचते. त्यामुळे गर्मीपासून संरक्षण करण्याकरिता सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात कूलर, पंख्याचा वापर या कालावधीत सुरू होतो. मात्र, यावर्षी ऊन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाच्या लहरीपणामुळे नागरिक धास्तावले आहेत.
उन्हाच्या तीव्रतेमुळे वर्षभर घरात पडून असलेले कूलर नागरिकांनी काढण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात तर एवढ्या लवकर न दिसणारे कूलर, पंखे दुरुस्ती कामाची लगबग वाढली आहे.तसेच नविन कुलर,पंखे घेण्याकडेही नागरिकाचा कल दिसून येत आहे. वर्षभर कूलर बंद राहत असल्याने कूलर सुरू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिक कारागिरांच्या मागे धावत आहेत. यामुळे कूलर, पंखे दुरुस्त करणाऱ्या कारागिरांना सद्य:स्थितीत मात्र अच्छे दिन आले आहेत.
यावर्षी कुलर दुरूस्ती व विविध सुटे पार्टला अधिक पैसे मोजावे लागत आहेत. दोन वर्ष कोरोनाचे संकट असल्याने अनेकांवर बेरोजगारीची संकट कोसळले. व्यवसाय डबगाईस आले. दरम्यान यातून भरून निघण्यासाठी काही कारागिरांनी आपल्या मजुरीचे दर वाढविले आहेत. पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे पंखे, कुलर साहित्याच्या वाहतुकीचा खर्च वाढला आहे. कामाचे वेळापत्रक कोलमडले
गावखेड्यात नागरिक उन्हापासून संरक्षण होण्यासाठी सकाळी ७ वाजतापासून दुपारी दोन वाजेपर्यंत शेतात काम करायचे. मात्र, यावर्षी उन्हाचा पारा शिगेला पोहोचल्याने, शेतमजूर, गवंडी कामगारांची लाही होत आहे. अक्षरश: अंग पोळून निघण्यासारखे ऊन तापत असल्याने शेतकरी, मजुरांच्या कामाचे वेळापत्रक कोलमडले आहे. उन्हाच्या तडाख्याने शेतमजुर व बांधकाम मजुरही सकाळी लवकर कामावर जात आहेत. वाढत्या तापमानाची झळ मानवासह पशु, पक्षी, वन्यप्राण्यांना बसू लागली आहे. जनावरेही रानात चरण्यापेक्षा सावलीचा आडोसा घेत आहेत. रानातील विहिरी, पाणवठ्यावर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे महत्वाचे आहे.
वाढत्या उष्णतेच्या झळा
गेल्या काही दिवसापासून उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.अनेकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.यापासून थोडी सुटका मिळविण्यासाठी नागरिकाकङून कुलर,पंखाचा वापर केला जात आहे.सध्या दुरूस्ती बरोबरच नविन कुलर,पंखे घेण्याचा कल नागरिका मध्ये दिसून येत आहे.दुरूस्तीसाठी ही मोठ्या प्रमाणात येत आहेत.
नसीम पठाण , कुलर दुरूस्तीधारक, ईट
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.