आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगाची लाहीलाही:भूमसह ईट परिसरामध्ये उन्हाचा कडाका वाढला, 40 वर तापमान; रस्त्यांवर लोकांची कमी गर्दी

ईट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईट परिसरासह सर्वञ गेल्या काही दिवसांपासुन उन्हाचा तडाखा वाढला आहे. नागरिक शक्यतो दुपारी बाहेर जाण्याचे टाळत आहेत. शेतकरी वर्गदेखील सकाळच्या प्रहरी शेतातील कामे मार्गी लावत आहे.परिणामी शेतीच्या कामांना दुपारी काहीसा ब्रेक लागल्याचे चित्र आहे. नागरिकदेखील असतील ती कामे सकाळी व संध्याकाळी करत आहे. तर दुपारी रस्त्यावरील वाहनांची वर्दळही मंदावली आहे. दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका तीव्र असल्याने नागरिक घराबाहेर पडत नसल्याने व्यापारी, दुकानदार, किरकोळ विक्रते दुपारच्या वेळेस काही प्रमाणात व्यवहार बंद ठेवत आहेत. उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे अनेकांना डोळे, अशक्तपणा ,त्वचा विकार व इतर त्रास जाणवू लागले आहेत. तर वातावरणातील सततच्या बदलामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. एरव्ही वर्दळ असणारे ईट मधील रस्ते दुपारी निर्मनुष्य दिसत असून , वाहनांची गर्दी कमी दिसत आहे. उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी दुपारी व रात्री घरोघरी पंखे, कुलर चालू ठेवले जात आहेत. तर प्रवाशांकडून बाटली बंद थंड पाण्याची मागणी वाढली आहे.

तापमानात होत असलेल्या बदलामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले
एरव्ही वर्दळ असणारे ईट मधील रस्ते दुपारी निर्मनुष्य दिसत असून , वाहनांची गर्दी कमी दिसत आहे. उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी दुपारी व रात्री घरोघरी पंखे, कुलर चालू ठेवले जात आहेत. तर प्रवाशांकडून बाटली बंद थंड पाण्याची मागणी वाढली आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाच्या तडाख्याने आईस्क्रीम, कुल्फी सरबत, ताक, लस्सी आदींना मागणी आहे. तर उसाच्या गुऱ्हाळ्यावरदेखील नागरिक गर्दी करु लागले आहे. शरीरात गारवा निर्माण करणारे कलिंगड, काकडी, खरबुजांच्या खरेदीस नागरिकांची पसंत वाढली आहे. तहान शमविण्यासाठी माठातील थंड पाणी व थंड पदार्थ सेवानकडे कल वाढला आहे. बाटलीबंद शीतपेयांपेक्षा घरगुती शीतपेयाच्या सेवनाकडे ज्येष्ठ नागरिकांचा कल आहे. दुचाकी व चारचाकीवरून प्रवास करणारे प्रवासी, नागरिक व शेतकरी झाडाच्या सावलीत विश्रांती घेत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रवासादरम्यान उन्हापासून बचाव करण्यासाठी तोंडाला स्कार्फ, ओढणी तर डोक्‍यावर टोपीचा वापर करत आहेत.

भूम तालुक्यात रस्त्यावर शुकशुकाट
गेल्या आठवडाभरापासून पारा हा सरासरी ४१ अंशांवरच स्थिरावल्याने नागरिकांची लाहीलाही होत आहे . यामुळे कूलर, एसी यंत्रणेची मागणी वाढली असून, थंडपेयांकडे नागरिकांची पावले वळत असल्याचे दिसून येत आहे . विशेष करून शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच कडक उन्हामुळे बहुतांश जणांनी घराच्या बाहेर न निघणेच पसंत केले तर काहींनी उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, गॉगल्स आणि पांढरा रुमाल बांधूनच घराबाहेर पडणे पसंत केले. हवामान शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार बुधवार ते शनिवार हे चार दिवस प्रचंड उष्णतेचे राहतील, असे संकेत दिले आहेत आणि हा शास्त्रज्ञांचा अंदाज खराही ठरला. मुळातच तालुका खडकाळ डोंगररांगांनी वेढलेला आहे त्यात शहर तर खडकावर वसलेले असल्याने शहरात उष्णता मोठ्या तीव्रतेने जाणवत आहे. उन्हाच्या तीव्रतेचा मोठा फटका बसत असून, दुपारी रस्त्यावर गल्लोगल्ली शुकशुकाट दिसून येत आहे. नेहमी वर्दळीची ठिकाणे फ्लोरा चौक, ओंकार चौक, गोलाई तसेच मेन रोड यासह अन्य भागांतून अगदी सहज ये - जा करताना नागरिक दिसून आले. सायंकाळी पाच वाजेनंतरच बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसू लागली. शहरातील विविध भागांतील रसवंती, शीतपेयांची दुकाने देखील गर्दीने फुलली होती. लस्सी, ताक पिण्यासह उसाच्या रसाला अधिक मागणी असल्याचे दिसून आले. प्रचंड उष्णतेमुळे प्रशासकीय कार्यालयातील येणाऱ्या गर्दीवरही परिणाम दिसून येत आहे . उन्हाची तीव्रताही होळी सणानंतर वाढते त्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. त्यातच चार दिवस आणखी सूर्य कोपणार असे संकेत दिले आहेत . त्यांचा तोही अंदाज खरा ठरल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. उष्णतेपासून बचावासाठीचे सर्वते उपाय करूनच नागरिक कामानिमित्त घराबाहेर पडत आहेत.

बातम्या आणखी आहेत...