आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामंडळ:कळंब आगारातून सर्वाधिक 43 बसेस रस्त्यावर, उस्मानाबाद आगारात संपकरी होताहेत रुजू, 429 पैकी 156 बसेस धावताहेत रस्त्यावर, 22 हजार प्रवाशांना लाभ

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तूर्तास एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही, कामावर हजर होणारे वाढले

जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहेत. दुसरीकडे कामावर रुजू होणाऱ्या संपकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे ३० मार्च पर्यंत कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे समोर आले आहे. त्याच बरोबर कामावर हजर कर्मचाऱ्यांनी एसटीची चाके गतीमान केली असून ४२९ पैकी १५६ बसेस रस्त्यावर धावत असून २२ हजार प्रवाशांना त्याचा लाभ होत असल्याचे चित्र सोमवारी समोर आले.

गेल्या साडेचार महिन्यापासून जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाने महामंडळाचे विलीनीकरण करुन घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहेत. एकाच महिन्यानंतर संप करी मंडळींकडून कारवाईच्या भितीपोटी कामावर हजर होण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर नियमित कामावर हजर होणाऱ्यांची संख्या वाढ सुरुच आहे. मात्र, अद्यापही निम्यापेक्षा अधिक कर्मचारी संपा वरच ठाम आहे. कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे काही मार्गावर बसेस सुरु झाल्या आहेत. मात्र, काही दुर्गम आणि ग्रामीण भागात बसेस बंदच आहेत. त्यामुळे खासगी चालकांकडून प्रवाशांची लूट अद्यापही सुरुच आहेत. दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दहा मार्च पर्यंत डेडलाईन देऊन कामावर रुजू होण्याची डेडलाईन दिली होती. तसेच कामावर हजर न होणाऱ्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे त्या काळात कुणावरच कारवाई झाली. मात्र, या दरम्यान २०० कर्मचारी कामावर रुजू झाले होते. त्यामुळे अधिक एसटी बसच्या चाकांना गती आली आहे.

एकाच महिन्यात दोन डेडलाइन
प्रारंभी ११ मार्चला न्यायालयात सुनावणी होणार असल्याने १० मार्च पर्यंत कामावर हजर होण्याची डेडलाइन दिली होती. सुनावणी लांबणीवर पडली. मंत्रिमंडळाने विलीनीकरण होणार नसल्याचा ठराव घेत न्यायालयास कळवले. आता पुन्हा ३० मार्चची डेडलाइन दिली.

पुन्हा दहा कर्मचारी कामावर हजर
परिवहन मंत्र्यांनी आता पुन्हा ३० मार्चपर्यंत कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्याने दहा कर्मचारी आगारात हजर झाले आहेत. कर्मचारी कामावर हजर होण्याचे प्रमाण वाढत आहेत. पांडुरंग पाटील, आगार प्रमुख.

दिवसभरात ६५ मार्गावर १५६ बसच्या ४५० फेऱ्या
सध्या १००० कर्मचारी कामावर हजर झाल्याने ६५ मार्गावर १५६ बसेस ४५० फेऱ्या करत ४६ हजार ५५४ किमी धावल्या. यात २२ हजार ६८६ प्रवाशांनी प्रवास केला. सर्वाधिक ४३ बस कळंब आगारातून सोडण्यात आल्या. त्यानंतर उस्मानाबाद आगारातील ३७ तर तुळजापूर आगारातून ३५ बस सोडण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...