आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आसु गणाच्या समावेशाने समीकरणे बदलणार ; राजकीय मोर्चेबांधणी सुरू

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या जवळा (नि) गटात पंचायत समितीच्या सीरसाव, जवळा (नि) व आसु या तीन गणांचा समावेश आहे. आसु गणाचा समावेश झाल्याने राजकीय समीकरण बदलणार आहे. तालुक्यातील जवळा (नि) गटात जवळा (नि), येणेगाव, सावदरवाडी, आरणगाव, टाकळी, घारगाव, सीरसाव, वाकडी, भांडगाव, हिंगणगाव (बु), भांडगाव, कांदलगाव, आसु, पिंपळवाडी, ऐणापुरवाडी, ब्रम्हगाव आदी १५ गावांचा समावेश आहे. जिल्हा परिषद गटात निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारास प्रचार यंत्रणा तगडी लावावी लागणार असून प्रत्येक मतदाराच्या गाठीभेटी घेण्यासाठी फिरावे लागणार आहे. पंचायत समितीच्या जवळा (नि) गणात टाकळी, घारगाव, जवळा (नि), आरणगाव, येणेगाव, सावदरवाडी आदी गावे येतात. सीरसाव गणात वाकडी, हिंगणगाव (बु), सीरसाव, भांडगाव, कांदलगाव आदी गावे आहेत. आसु गणात पिंपळवाडी, आसु, ऐनापुरवाडी व ब्रम्हगाव येते. जवळा (नि) गणातून शिवसेनेच्या शीतल वाघमारे यांना २८९७ मते मिळाली होती, त्यांनी राष्ट्रवादीच्या सारिका राऊत (२१६२) यांचा ७३५ मतांनी पराभव केला होता. भाजपच्या शबाना पठाण यांना १०३९ मते मिळाली होती. सीरसाव गणातून शिवसेनेच्या अनिता चोबे यांनी २९४५ मते घेऊन राष्ट्रवादीच्या संगीता नवले (२७७७) यांचा १६८ मतांनी पराभव केला होता. भाजपच्या अलका रगडे यांना ८७५ मते मिळाली होती.

शिवसेनेचा बालेकिल्ला, गड कोण जिंकतो, याकडे लक्ष मागील पंचवार्षिक निवडणुकीत जवळा (नि) जिल्हा परिषद गटातुन शिवसेनेचे दत्ता साळुंके यांना ६३२३ मते मिळाली होती. त्यांच्यात व राष्ट्रवादीचे हणुमंत कातुरे यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. दत्ता साळुंके यांनी हणुमंत कातुरे (५५३७) यांचा ७८६ मतांनी पराभव केला होता. भाजपचे राहुल कारकर यांना ११५६ मते मिळाली. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून जवळा (नि) ची ओळख आहे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलल्यामुळे कोण गड काबीज करतो, याची उत्सुकता लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...