आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिशय दुरावस्था:सांजा रोडची दुरुस्ती झाल्याने गैरसोय संपणार! ; शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते आंदोलन

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिशय दुरावस्था झालेल्या शहरातील सांजा रोडची अखेर दुरुस्ती सुरू झाली असून, त्यामुळे अनेक महिन्यांपासून वैतागलेल्या या भागातील नागरिकांची व्यथा संपणार आहे.या रस्त्याने ग्रामीण भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांचेही प्रचंड हाल सुरू होते,त्यामुळे रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी जोर धरत होती.

बसस्थानक ते भवानी चौक या सांजा रोडची दुर्दशा कायम असून,या मार्गावरून सांजा तसेच वरूडा,सारोळा,सकनेवाडी आदी गावातील नागरिकांची दररोज ये-जा असते.रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून, त्यामुळे अपघात घडत आहेत.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डोळेझाक करण्यात येत होती.रस्ता दुरूस्तीसाठी शिवसेनेच्या वतीने काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते.पावसाळयाच्या काळात तर लोकांचे हाल व्हायचे. खड्ड्यात पाणी साठल्याने वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांनाही खड्डयाच्या खोलीचा अंदाज येत नव्हता.

तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीनेही रस्त्याच्या दुरूस्तीसाठी पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर या मागणीचा विचार करून बांधकाम विभागाने रस्त्याची दुरूस्ती सुरू केली आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांचे तूर्त हाल थांबतील,अशी आशा आहे.भवानी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतचे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असून,या कामाचा शुभारंभ या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. घुटे,सांजाचे माजी सरपंच मुकुंदबापू सूर्यवंशी, लिंबराज डुकरे, भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष मनोज देशमुख, कंत्राटदार दत्तात्रय देशमुख आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.रस्ता दुरूस्ती सुरू केल्याबद्दल या भागातील नागरिकांच्या वतीने लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...