आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृती शताब्दी:उमरगा येथे भारतीय बौद्ध महासंघाचा पुढाकार, तुळजापुरात स्तब्ध राहून आदरांजली; राजर्षी शाहू महाराजांना विविध उपक्रमांतून अभिवादन

उमरगा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल तालुका शाखेच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांचा १०० व्या स्मृतिदिनी शुक्रवारी सायंकाळी अभिवादन करण्यात आले. राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षक शिवाजी साखरे, अंबादास जाधव यांच्या हस्ते झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्रिशरण, पंचशील घेऊन १०० सेकंद स्तब्ध राहत मानवंदना देण्यात आली. यावेळी कुन्हाळी येथील पंडितराव ढोणे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त युगप्रवर्तक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सतीश ढोणे यांनी एकुरगा येथील स्नेहा प्रभाकर गायकवाड हिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. बीएससी नर्सिंग शैक्षणिक साहित्य विद्यार्थिनीला भेट दिले. या वेळी तालुका सरचिटणीस प्रभाकर गायकवाड, ॲड. मल्हारी बनसोडे, कोषाध्यक्ष जीवन सूर्यवंशी, ॲड. हिराजी पांढरे, रामभाऊ गायकवाड, उमाजी गायकवाड, अविनाश भालेराव, राजेंद्र सूर्यवंशी, नागनाथ कांबळे, तात्याराव मांदळे, प्रकाश कांबळे, प्रा. रमेश जकाते, विजय ओवांडकर, गोविंद जाधव, बालाजी गायकवाड, राघवेंद्र गावडे, ॲड. संदीप सवई, ॲड मंमाळे, आनंद कांबळे, किरण कांबळे, जी. एल. कांबळे, विश्वास कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, वकील, शिक्षक, पत्रकार व भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. प्रा. संजीव कांबळे यांनी प्रास्ताविक केले. तालुकाध्यक्ष संतोष सुरवसे यांनी आभार मानले.

परंड्यात रा. गे. शिंदे महाविद्यालयात अभिवादन
परंडा । येथील गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती दिन शताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिनानिमित्त शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्या डॉ. दीपा सावळे यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. महेश कुमार माने, प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, डॉ. प्रशांत गायकवाड, प्रा. दीपक तोडकरी, प्रा. संतोष काळे, प्रा. अनिसा शेख, कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब दिवाणे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बोलताना प्राचार्या डॉ. दीपा सावळे म्हणाल्या की, सर्व जाती-धर्माचे लोक एका पातळीवर यावेत, यासाठी सर्वच जातीधर्माच्या लोकांना महाराजांनी शिक्षणाची सोय केली. वसतिगृहाची सोय केली. माणसाला महत्त्व दिले पाहिजे, धर्म, पंथ यापेक्षा सर्वात मोठा देश आहे. देशातील माणूस व माणूसकी जपली पाहिजे, असे राजर्षी शाहू महाराज यांनी या देशवासियांना सांगून अनमोल असे योगदान दिले. देशात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न केले. त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे, तरच त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांना अभिवादन केले असे म्हणता येईल.

बातम्या आणखी आहेत...