आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारखानदारांच्या मनमानी:मार्च संपत आला, तुरेही संपले; ईट परिसरात ऊस अजूनही फडातच उभा

ईट2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

ऊस तोडणीचा हंगाम सुरू होऊन आता शेवटच्या टप्यात आला आहे. मार्च महिनाही संपत आला आहे. ऊसाला आलेले तुरेही तोडणीच्या प्रतिक्षेत येऊन संपले. मात्र ईटसह परिसरातील अजून निम्मा ऊस शेतातच उभा आहे. यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. ऊस जातो की नाही, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. पाहिजे तेवढे पैसे घ्या पण ऊस तोडा अशी विनवणी शेतकऱ्यांकडून ऊसतोड मजुरांना करण्यात येत आहे. वर्षभर घाम गाळून जोपासलेल्या ऊसाची परिस्थिती यंदा भयानक आहे. हमखास एकरकमी उत्पन्न देणारे नगदी पीक म्हणून ऊस पिकाकडे शेतकरी वळले असताना राजकीय स्वार्थ व कारखानदारांच्या मनमानी कारभारामुळे ईटसह परिसरातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील ऊस अद्यापही शेतातच उभा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखाे रूपयांचा फटका बसतो आहे. हंगाम सुरू होवून चार महिने उलटले. सोळा महिन्यांचा कालावधी होवूनही ऊसतोड न झाल्याने उभ्या ऊसाला तुरे फुटले आहे. तुरे आलेल्या ऊसाचे आता तुरे संपले आहेत. मात्र ऊस अजूनही फडातच उभा आहे. त्यामुळे प्रतवारी घसरल्याने वजनात व प्रामुख्याने उताऱ्यात घट येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये संपूर्ण ईट परिसरातील ऊस तोडणी झाली होती.

९०० हेक्टरवर लागवड, अर्धा ऊस फडातच
सध्या अर्धा मार्च संपला आहे. तरीही परिसरात ४०-४५ टक्के शेतकऱ्यांचा ऊस फडातच उभा आहे. ९०० हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे. यातील ५०० हेक्टरवरील ऊसाची तोडणी झाली. अजूनही २५० ते ३०० हेक्टरवरील ऊस फडातच उभा आहे. यामध्ये अनेक शेतकरी कारखान्याचे सभासद आहेत. त्यांचाही ऊस तोडणीस कारखान्यांकडून टाळाटाळ होत आहे. लाखो रूपयांचा फटका बसतो आहे. हंगाम सुरू होवून चार महिने उलटले. सोळा महिन्यांचा कालावधी होवूनही ऊसतोड न झाल्याने उभ्या ऊसाला तुरे फुटले आहे. तुरे आलेल्या ऊसाचे आता तुरे संपले आहेत. मात्र ऊस अजूनही फडातच उभा आहे. त्यामुळे प्रतवारी घसरल्याने वजनात व प्रामुख्याने उताऱ्यात घट येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये संपूर्ण ईट परिसरातील ऊस तोडणी झाली होती.

गेल्यावर्षी मार्चमध्ये झाली होती परिसरातील संपूर्ण तोडणी
शेतकऱ्यांच्या कारखान्याकडे चकरा
सध्या ईट व परिसरात वाशी येथील शिवशक्ती, सोनारी येथील भैरवनाथ,चोराखळी येथील धाराशिव, सोलापूर येथील गोकुळ शुगर, हावरगाव येथील शंभुमहादेव, जवळा येथील बाणगंगा, चौसाळा येथील भीमाशंकर आदी कारखान्याच्या ५०-५५ टोळ्या ऊस तोडणी करत आहेत. मात्र या टोळ्या अपूऱ्या पडत आहेत. शेतकरी दररोज चकरा मारुन कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडे विनंती करत आहेत. ऊस तोडणीसाठी आज ना उद्या आपला नंबर येईल, या आशेने शेतकरी ऊसाला पाणी देत आहेत. परंतु संबंधीत कारखान्यांकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे सभासद शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...