आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारपेठ सजली:कारहुणवी सणानिमित्त साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ सजली

उमरगा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकात साजरा होणारा बेंदुर सण शहर व तालुका सीमावर्ती भागात कारहुणवी म्हणून मंगळवारी (दि.१४) साजरा होणार आहे. त्यामुळे सणासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठ सजली आहे.

तालुक्यातील सीमावर्ती भागातील गावांसह इतरही गावात कारहुणवी सण साजरा केला जातो. उर्वरित गावात बैलपोळा साजरा करण्यात येतो. कर्नाटकी बेंदुर म्हणून प्रचलित हा उत्सव महाराष्ट्रातील काही भागात कारहुणवी म्हणून साजरा केला जातो. काळ्या आईची अविरतपणे मेहनतीची कामे करणाऱ्या बैलजोडी व पशूंना सणादिवशी बहुमान मिळतो.

सकाळी बैलांना आंघोळ घालणे, रंगरंगोटी करणे, गोड पक्वान्न खाऊ घालून सायंकाळी मंदिरापासून गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. कारहुणवी सणानिमित्त वर्षातून एकदा बैलांसाठी असलेल्या सणाची हौस पूर्ण करण्यासाठी बळीराजा बैलांसाठी विविध आभूषणे खरेदी करताना शनिवारी (दि.११) दिसून आला. कदेर येथे कारहुणवी सण उत्साहात साजरा केला जातो. गावात मुख्य मार्गावरून बैलाची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर गावातील सर्व बैलजोडया, काठी व दांडपट्टा फिरवणे व शोभेचा मल्लखांब व मल्लखांबासोबत सोंगाडयाच्या छातीवर दगडी शिळ फोडून कारहुणवी सणाची सांगता करण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...