आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कणा:परिचारिका या रुग्णालयाचा कणा ; दिव्य मराठी विशेष : स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प संचालक जोशी यांचे मत

लोहारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुग्णसेवेत परिचारिकांचे योगदान महत्वाचे असून त्यांचे कौशल्य, विनयशीलता व कामातील अनुभवामुळे रुग्ण आजारातून लवकर बरे होण्यास मदत होते. त्यामुळे परिचारिका या रुग्णालयाचा कणा आहेत, असे प्रतिपादन सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी येथे केले.

तालुक्यातील सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी ( दि.१२) जागतिक परिचारिका दिनानिमित्त जोशी बोलत होते. फ्लोरेंस नायटिंगेल यांचे विचार परिचारिकांनी आत्मसात करावे, असे आवाहन यावेळी जोशी यांनी केले. या कार्यक्रमात सर्व परिचारिकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या रुग्णसेवेचा या महान कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमास स्पर्शचे वरिष्ठ डॉ. अशोक मस्के, सर्जन डॉ. मनीष सिन्हा, स्त्रीरोग तज्ञ डॉ. दिपीका चिंचोळी, डॉ. वैभव माडजे यांच्यासह सर्व परिचारिका व रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...