आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवार:पावसाची उघडीप,कोवळे पीक जगविण्याची धडपड ; एकोंडी जहागीर शिवारात ठिबकद्वारे पाणी

उमरगा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात मान्सुनपुर्व झालेल्या जोरदार पावसामुळे मृग नक्षात्राच्या भरवश्यावर काही शेतकऱ्यांनी आगोटी पेरणी केली. पेरणीनंतर कोवळे पिकांनी दिवसाच्या कडक उन्हात आता माना टाकायला सुरु केली आहे. काही शेतकऱ्यांनी आता पावसाळ्यात पिके जगवण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करून पिकांना जीवनदान देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यंदा मान्सुन पूर्वीच रोहिणी नक्षत्रातील पावसाने शेवटच्या टप्प्यात दमदार सुरुवात करून हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवला असल्याचे शेतकरी बोलत होते. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पाऊस होईल या आशेवर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी पेरणीच्या लगबगीस सुरुवात केली. गतवर्षी सोयाबीन, हरभरा पिकाचे उत्पन्न मुबलक निघाल्याने त्याचे विक्री करण्याचा प्रश्न अद्याप शेतकऱ्यांसमोर असून ज्यांनी विक्री केली त्यांना पैसे मिळाले नाहीत, यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनसोबतच उडीद, मुग आदी पिकांना प्राधान्य दिले. यंदा वेळेवर पेरण्या होवून उत्पन्न मुबलक होईल या आशेत असलेल्या शेतकऱ्यांना पावसाने ओढ दिल्याने आगोटी पेरणी होवून तब्बल १५ दिवसाच्यानंतर पावसाने सुरुवात केली नसल्याने कोवळे अंकुर आता माना टाकायला सुरू केली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण होत आहे पण पाऊस लपंडाव खेळत असतानाच हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरत असल्याचे शेतकरी बोलत आहेत. आता तर दिवसभर कडाक्याचे उन्ह असून खरीप वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे. दरम्यान तालुक्यात काही भागातील शेतकरी पावसाळ्या मध्ये पिकांना जिवनदान देण्यासाठी धडपड सुरू केली असून ठिबक व तुषार सिंचन करून कोवळी पिके जगविण्याचा प्रयत्न करत आहेत. दहा दिवसाच्या आत पाऊस झालातर पिकास थोडाफार आधार मिळण्याची आशा शेतकऱ्यांना लागली आहे. तालुक्यातील एकोंडीजहागीर येथील शेतकरी भगवंत बिराजदार उपलब्ध पाण्यावर कोवळी पिके जगविण्यासाठी तुषार सिंचनाद्वारे पाणी देवून पिकाला आधार देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...