आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:त्रिकोळी येथील सरपंचास पदावरुन काढण्याचा विभागीय आयुक्तांचा आदेश

उमरगा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील त्रिकोळी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकांनी विविध योजनेतील रक्कम परस्पर उचलल्याने चौकशीअंती सरपंचास विभागीय आयुक्ताने पदावरून काढून टाकण्याचा आदेश १९ जुलै रोजी दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर राजेंद्र मुगळे यांनी त्रिकोळी येथील येथील सरपंच रवींद्र शंकर हंगरगे व ग्रामसेवक यांनी विविध योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते . या चौकशीमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी केलेल्या कामामध्ये ३०३८०३ रुपयांची तफावत आढळून आली होती. सरपंच व ग्रामसेवक यांना वसुलपात्र रक्कम तत्काळ भरण्यास सांगण्यात आले होते . तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी १७८५०३ रुपये रक्कम भरणा केली होती . उर्वरित रक्कम १२५३०० ही रक्कम मुल्यांकनाशिवाय उचल केल्याचे चौकशीत आढळून आले. वरील रक्कम सरपंच व ग्रामसेवक यांनी समप्रमाणात प्रत्येकी ६३६५० रुपये दोघांनी मिळुन १२५३०० भरणा केली .मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी चौकशी अहवाल विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे सदर केला होता. सादर केलेल्या अहवालानुसार सरपंच रवींद्र शंकर हंगरगे यांनी लेखा संहिता २०११ मधील वित्तीय तरतुदीचा भंग करुन कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आल्याने अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी सरपंच ग्रामपंचायत त्रिकोळी (ता. उमरगा) यांना पदावरुन काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.

सरपंचाला हटवण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी १९ जुलै रोजी दिला होता. हा आदेश प्राप्त झाला नसल्याचे गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे यांनी शुक्रवारी सांगितले. परंतु शुक्रवारी संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास सरपंचाच्या अपात्रतेचा लेखी आदेश दिला.

बातम्या आणखी आहेत...