आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादी शेळी:समुद्राळ येथील उस्मानाबादी शेळीने दिला सहा पिलांना जन्म

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात समुद्राळ येथील शेळीपालक नागनाथ व्यंकट परताळे यांच्या शेळीने तब्बल सहा पिलांना जन्म दिला. सध्या ही शेळी सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरत असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. राजू मरेवाड यांनी दिली.

उस्मानाबादी शेळीने जन्म दिलेल्या सहा ही पिलांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती आहे. सदर पशुधन विकास अधिकारी डॉ. मरेवाड यांनी शेळी आणि पिलांची पाहणी केली असून उस्मानाबादी-सिरोही या दोन्ही जातींचे संक्रम असलेल्या या शेळीची पिले जगविण्यासाठी नेमके काय करायला हवे याबाबत शेळीपालक यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या शेळ्याचे संवर्धन करून त्यापासून कृत्रिम रेतनासाठी विर्यमात्रा तयार करण्यात येणार आहे, असे पशुधन विकास अधिकारी डॉ. राजू मरेवाड यांनी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...