आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी वाहनांचा आसरा:प्रवासी तब्बल तीन तास ताटकळले ; कोकण, मुंबईस बसेस पाठवल्याने अडचण

उस्मानाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूम आगारातील बसेसला डिझेल मिळत नसल्याने अडचण येत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून तेथील बसेस आगारातच असताना उस्मानाबाद आगारातील ८४ पैकी २५ बसेस मुंबईला गणेश दर्शनासाठी पाठवल्याने नियमित मार्गावरील नियोजित बसच्या फेऱ्या कमी झाल्याने ऐन सनासुदीत प्रवाशांची गैरसोय झाली. अनेकांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागला.

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील सहा आगारातून मुंबई आणि कोकणात गणपती दर्शनासाठी १२५ बसेस पाठवल्या आहेत. वरिष्ठ कार्यालयातून जास्तीच्या बसेसची मागणी असल्याने येथून इतक्या मोठ्या प्रमाणात बसेस पाठवण्यात आल्या आहेत. उस्मानाबाद आगारात केवळ ५९ बसेसने सेवा देण्यात येत आहेत. त्यात जिल्ह्यातून इतर ठिकाणी विविध मार्गावर सोडवण्यात आलेल्या बसेस कमी करुन मुंबईला पाठवण्यात आल्याने लातूर, औासा, हैद्राबाद, पुणे, भिवंडी मार्गासह जिल्ह्यातील इतर मार्गावरच्या बसेस कमी करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे प्रवाशांना आगारात डिझेल नसल्याने गाड्या सोडण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहेत. तर, प्रशासनाकडून बसेसची कमी असल्याने अडचणी येत असल्या तरी प्रवाशांना सुविधा देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहेत.

कोकण, मुंबईस बसेस पाठवल्याने अडचण
जिल्ह्यातून कोकण आणि मुंबईसाठी जिल्ह्यातून यंदा जास्तीच्या बसेस मागणीनुसार पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे काही प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे. १२५ पैकी दोन बसेस परत आल्या असून उर्वरित बसेस लवकरच मिळतील. त्या आल्यावर अडचण येणार नाही.
चेतना खिरवाडकर, विभाग नियंत्रक.

बातम्या आणखी आहेत...