आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रोत्सव:श्री महाकाली मातेच्या‎ यात्रोत्सवाला सुरुवात‎‎

धडगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकुवा शहरालगत‎ असलेल्या सोरापाडा येथील‎ नवसाला पावणारी अशी ख्याती‎ असलेल्या श्री महाकाली मातेच्या‎ यात्रोत्सवाला माघ शुद्ध पौर्णिमेला‎ दि.४ पासून मोठ्या जल्लोषात प्रारंभ‎ झाला आहे. या यात्रोत्सवाला‎ ऐतिहासिक परंपरा लाभली असुन‎ हा यात्रोत्सव शतकाच्या पार गेला‎ आहे. माघ शुद्ध पौर्णिमेला दि.१९‎ फेब्रुवारी २०१९ रोजी महाकाली‎ मातेची पहिली यात्रा भरविण्यात‎ आली होती.

दि.४ फेब्रुवारी ते‎ ८फेब्रुवारी २०२३ दरम्यान हा‎ यात्रोत्सव राहणार आहे. ही यात्रा‎ त्यामुळे परिसरातील यात्रेकरुं मध्ये‎ चैतन्य व उत्साहाचे वातावरण आहे.‎ या यात्रेला सातपुड्यातून हजारोंच्या‎ संख्येने गावठी, खिल्लारी, नागोरी‎ जातीच्या बैलांची हजारोंची आवक‎ होते. या बैल बाजारावर कृषी उत्पन्न‎ बाजार समितीचे नियंत्रण असते.‎ बैल बाजारात बैलांच्या खरेदी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विक्रीतून कोट्यवधी रुपयांची‎ उलाढाल होत असते. केवळ‎ महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्य प्रदेश‎ व गुजरात राज्यांतून भाविक व‎ व्यावसायिक दाखल झाले आहेत.‎ मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे‎ अध्यक्ष आमदार आमश्या पाडवी,‎ उपाध्यक्ष पृथ्वीसिंग पाडवी‎ यांच्यासह विश्वस्त मंडळ सहकार्य‎ करीत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...