आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त:नामवंत मल्ल घडवलेल्या डोंजा तालमीची दुरावस्था ; तालीम नामशेष होण्याच्या मार्गावर

डोंजा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नामवंत मल्ल घडवलेल्या परंडा तालुक्यातील डोंजा येथील तालमीची दुरावस्था झाली आहे. येथील कुस्ती शौकीन युवकांसाठी शहाजी पाटील यांच्या काळात तालीम उभारण्यात आली होती. येथील तालीम मध्ये सराव करुन अनेक नामवंत पैलवान तयार झाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून तालमीची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे ही तालीम नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, ही तालीम ग्रामीण भागातील गरीब युवकांसाठी दारिद्र्यातून बाहेर येण्याचा व समाजात पत मिळवण्याचा मार्ग होती. कुस्त्या खेळणारे बहुतांश तरुण हे गरीब शेतकरी कुटुंबातील आहेत.

साधारण पाच टक्के पैलवान खेळात पुढे जातात व गावाचा लौकिक करतात. यासाठी दर्जेदार नवीन तालीम बांधावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. यात्रा व उत्सव काळात त्या ठिकाणी परिसरातील १५० मल्ल कुस्तीचे कौशल्य दाखवण्यासाठी येत असतात. त्यातून कुस्तीपटूंना व्यासपीठ मिळते. सोनारी परिसरातील अनेक नामवंत मल्ल महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. तालीम मधील लाल मातीत तयार होणारे मल्ल पुढे महाराष्ट्र केसरीपर्यंत मजल मारतात. त्यामुळे प्रत्येक गावात तालीम संघ उभारण्यासाठी लोकप्रतिनिधींना निधी द्यावी, अशी मागणी कुस्तीप्रेमी नागरिकांमधून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...