आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीव्र संताप व्यक्त:तीन वर्षा पासून पशुधन अधिकऱ्याचे पद रिक्त

ईट23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सर्वत्र लंपी आजारानी शेतकरयांना पुरते त्रस्त केले.मात्र शेतकऱ्यांना या आजाराबरोबरच पशुवैद्यकीय विभागात रिक्त पदे,लंपी प्रतिबंधक लशीचा तुटवडा यांचा सामना करावा लागत आहे.यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.ईट येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन अधिकाऱ्याचे पद हे गेल्या तीन वर्षापासून रिक्त आहे. शिपायाचे दोन पदेही गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत.यामुळे रिक्त पदामुळे शेतकऱ्यांना खाजगी पशु अधिकाऱ्यांकडून जनावरावर उपचार करावे लागत आहे.

ईट या ठिकाणी पशुवैद्यकीय श्रेणी १ चा दवाखाना आहे.या दवाखान्या अंतर्गत १० गावे व सुमारे १२ हजार जनावरे येतात.यासाठी येथील दवाखान्यात १ पशुधन अधिकारी, १ पशुधन पर्यवेशक ,१ परिचर ,२ शिपाई , आणि १ ड्रेसर अशी पदे आहेत.मात्र यातील पशुधन विकास अधिकारी, शिपाई पदे मागील काही वर्षाभरा पासून रिक्त आहे.याठिकाणी शासनानी लाखो रूपये खर्च करून नविन इमारत उभी केली आहे.माञ याठिकाणी अधिकारीच नसल्यामुळे सध्या तरी ही इमारत शोभेची बनली आहे.ईटसह परिसरातील नागेवाडी,तीबाचीवाडी,पखरूड,आद्रुड,आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो.

बातम्या आणखी आहेत...