आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रोत्सव:हिरवाईने नटलेला येडेश्वरी देवी मंदिराचा परिसर आजपासून भाविकांनी फुलणार

उस्मानाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शारदीय नवरात्रोत्सवास सोमवारपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शक्तिपीठ असलेल्या तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर येडेश्वरी देवीचे दर्शन घ्यावेच लागते, अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे. कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मातेचे मंदिर उंच डोंगरावर असून न थकता भाविक मंदिराच्या पायऱ्या चढून वर जाऊन देवीचे दर्शन घेतात.

रस्त्यालगत दुतर्फा दुकाने मंदिर बालाघाटच्या डोंगरावर असून सततच्या पावसाने मंदिराचा परिसर हिरवळीने नटून गेला आहे. त्यामुळे परिसर नयनरम्य दिसत आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दुतर्फा दुकाने आणि सभेावतालची हिरवळ येरमाळा येथील छायाचित्रकार सुखदेव गायके यांनी ड्रोनद्वारे टिपली आहे.

मंदिराला कसे जायचे? सोलापूर-धुळे महामार्ग तसेच खामगाव-पंढरपूर पालखी मार्गावर येरमाळा हे गाव आहे. गावापासून पूर्व दिशेला दोन किलोमीटर अंतरावर येडेश्वरी देवीचे मंदिर आहे.