आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दोन महिन्यांत सोन्याच्या दरात पाच हजारांची वाढ‎

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न सराईची आतापासून तयारी, अनेकांचे बुकिंग, गुंतवणुकदारांचेही लागले लक्ष‎ उस्मानाबाद‎ नोंव्हेबर महिन्यात सोन्याचे दर ५० हजार ५००‎ रुपये तोळ्यावर आले होते. मात्र, दोनच‎ महिन्यात तब्बल पाच हजार रुपयांची यात वाढ होऊन शनिवारी सोन्याचे दर ५५ हजार ५०० ‎ ‎ रुपयांवर गेल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे‎ यात चांदीने सर्वाधिक भाव खाल्ला असून‎ दोनच महिन्यात चांदीचे दर १५ हजार रुपयांनी ‎ ‎ वाढले.

त्यामुळे सद्या ७० हजार रुपये किलाे या ‎ ‎ प्रमाणे चांदीचा दर सराफा बाजारात बघायला ‎मिळाला. विशेष म्हणजे सोन्याच्या दरात ६०‎ हजार रुपये पर्यंत वाढ होण्याचे संकेत‎ व्यापाऱ्यांनी दिले.‎ आंतरराष्ट्रीय बाजारांसह होणाऱ्या घडामोडींचा‎ सोन्याच्या किमतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम‎ होत असतो. त्यानुसार गेल्या दोन महिन्यापूर्वी‎ म्हणजे ऐन दिवाळीतील काही दिवसात सोने‎ ५० हजार ते ५० हजार ५०० रुपयांच्या आसपास‎ होते.

त्यावेळी तो दर जास्त वाटत होता. मात्र,‎ त्यानंतर दोनच महिन्यात जानेवारी मध्ये‎ सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे‎ दिसून आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याचे‎ दर वाढत गेल्याने जिल्ह्यातही सोन्याला चांगली‎ चकाकी मिळाली. विशेष म्हणजे या काळातही‎ चांदी लाही चांगला मिळत आहेत.

दिवाळीत‎ ५५ हजार रुपये किलो असणारी चांदी आता‎ थेट ७० हजार रुपयांवर आली आहे. या‎ दरवाढीमुळे गुंतवणुकदारांना ही सोन्यामध्ये‎ गुंतवणुक करण्याचा अधिक विश्वास वाटत‎ आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातही मोठ्या‎ प्रमाणात सोने खरेदी होत असल्याचे दिसून‎ आले. विशेष म्हणजे दर वाढलेले असले तरी,‎ सराफा बाजारात नियमित सोने खरेदी‎ करण्यासाठी ग्राहकांकडून पसंती देण्यात येत‎ आहे. व्यापाऱ्यांनी ही आगामी लग्न सराई‎ लक्षात घेऊन ग्राहकांच्या मागणी प्रमाणे‎ आताच ऑर्डर देऊन ठेवल्या आहेत.‎

लाखोंची बुकिंग‎
सोन्याच्या दरात आणखी वाढ‎ होण्याचे संकेत मिळत असल्याने‎ ज्यांच्याकडे यंदा कर्तव्य आहे,‎ त्यांच्याकडून आताच बुकिंग करुन‎ ठेवण्यात येत असल्याचे समाेर आले.‎ आता पर्यंत लाखो रुपयांची बुकिंग‎ ग्राहकांनी केल्याचे समोर आले.‎ सद्याच्या दरात आणखी वाढ होण्याचे‎ संकेत मिळत असल्याने ग्राहकांचे‎ बुकिंगचे प्रमाण वाढले आहे.‎

६० हजार पर्यंत जाणार‎
आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या‎ दरवाढीमुळे सोन्याचे दर आणखी‎ वाढण्याचे संकेत मिळत आहेत. ६० हजार‎ रुपये प्रती तोळा जाऊ शकते. त्यामुळे‎ लग्न सराई-साठी ग्राहकांकडून आताच‎ बुकिंग करुन ठेवण्यात येत आहेत. त्याच‎ बरोबर अनेक ग्राहकांकडून सोन्यात‎ विश्वासाने गुंतवणूकही करण्यात येत‎ असल्याचे चित्र आहे.‎ - लक्ष्मण सोमासे, सराफा व्यापारी.‎

बातम्या आणखी आहेत...