आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंधळ:प्राचार्यांना धक्काबुक्की,‎ मुलाखती पाडल्या बंद‎

उस्मानाबाद‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूम शहरातील समर्थनगर येथील‎ शंकरराव पाटील महाविद्यालयात‎ चौंघांनी गोंधळ घालत प्राचार्यांना‎ धक्काबुक्की करत शिक्षक पदासाठी‎ सुरू असलेल्या मुलाखती बंद‎ पाडल्याची घटना शुक्रवारी घडली‎ होती. याप्रकरणी शनिवारी गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे.‎ भूम येथील प्राचार्य श्रीकृष्ण‎ भीमराव चंदनशिवे शुक्रवारी‎ सकाळी १० वाजता शकंरराव‎ पाटील महाविद्यालयाच्या‎ कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या व‎ डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ मराठवाडा विद्यापीठाच्या‎ आदेशावरून शिक्षक पदाच्या‎ मुलाखती घेत होते.

यावेळी भूम‎ येथील डॉ. बिभीषण भैरट, अनिल‎ भोरे, राजभूषण बोराडे, पोपट‎ जाधव यांनी शिक्षक पदाच्या‎ मुलाखती बंद करा, असे म्हणून‎ प्राचार्य श्रीकृष्ण चंदनशिवे यांच्याशी‎ हुज्जत घातली. तसेच अरेरावीची‎ आणि असभ्य भाषा करुन वाद‎ घातला. या प्रकारामुळे मुलाखती‎ घेण्याच्या प्रकियेत अडथळा आला.‎ याप्रकरणी श्रीकृष्ण यांनी‎ सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून‎ भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...