आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाशी तालुक्यातील तेरखेडा येथील सार्वजनिक स्मशानभूमीच्या दुरावस्थेमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना असून, अंधाराचे साम्राज्य असलेल्या स्मशानभूमीत पाण्याचीही समस्या असल्याने परिसरातील विहिरी, हौदावरून पाणी आणावे लागत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयाला निवेदन देण्यात आले.तेरखेडा स्मशानभूमीसंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,स्मशानभूमीमध्ये वीज आणि पाण्याची सोय नसल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांची गैरसोय होत आहे.
तसेच अंत्यविधीसाठी पाण्याची आवश्यकता असल्यास परिसरातील विहिरी व हौदावरून पाणी आणावे लागत आहे. स्मशानभूमीमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार कार्यरत स्थितीत असणे आवश्यक आहे. अंत्यविधी पूर्ण केल्यानंतर प्रवेशद्वार कार्यरत स्थितीत किंवा बंद स्थितीत असल्याने वन्य प्राण्यांकडून मृतदेहाची विटंबना होण्याचा धोका नाकारता येत नाही. तसेच स्मशानभूमीमध्ये झाडे-झुडपे वाढल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या गावकऱ्यांना साप, विंचवांचा धोका आहे.
त्याचबरोबर स्मशानभूमीची निगा राखली जाण्यासाठी तसेच तळीराम व समाजकंटक ह्यांच्याकडून स्मशानभूमीचे विद्रुपिकीकरण रोखण्यासाठी सी.सी टीव्ही बसवण्यात यावेत. यावेळी भाजयुमोचे प्रवीण घुले, तालुकाध्यक्ष सुधीर घोलप,आदेश घुले उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालय लिपिक बाळासाहेब चव्हाण यांनी निवेदन स्विकारले.
नागरिकांची गैरसोय दूर करणे आवश्यक
१२ जून रोजी आमच्या मातोश्रींचा अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीत गेलो असता सुविधांचा अभाव आढळून आला. पाणी व वीज या सुविधा स्मशानभूमीत असणे गरजेचे आहे. जेणेकरून अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांचा गोंधळ उडणार नाही. त्यामुळे प्रशासनाने सदर गोष्टीची दखल घेऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी. दत्ता सुतार, स्वीय सहाय्यक, शिक्षणमंत्री
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.