आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रक्रिया सुरू:कबाल्याचा प्रश्न मार्गी लागणार; वरिष्ठस्तरावरून प्रक्रिया सुरू झाली

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ५२ भूकंपग्रस्त गावातील नागरिकांना मालकी हक्काचे कबाले लवकरच मिळण्याची शक्यता आहे. उमरगा व लोहारा तालुक्यातील “अ” व “ब” वर्गवारीच्या गावांतील १ ऑक्टोबर २०२२ पूर्वी विना परवाना झालेले हस्तांतरणे संक्षिप्त चौकशी करून नियमानुकूल करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिल्याचे पत्र २९ सप्टेंबर रोजी आदेशित केले आहे. वरिष्ठस्तरावरून प्रक्रिया सुरू झाल्याने कबाल्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा भूकंपग्रस्तांना लागली आहे.

कलदेवलिंबाळा येथील ३३७ पैकी बऱ्याच घर मालकांना कबाला (मालकी हक्क प्रमाणपत्र) आत्तापर्यंत मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत असल्याने सरपंच सुनीता पावशेरे यांनी यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची भेटून घेवून निवेदन दिले होते.

शिवाय तत्कालीन उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी, तत्कालीन तहसीलदार अरविंद बोळंगे, माजी जिप सदस्य प्रा. सुरेश बिराजदार यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी सरपंच पावशेरे यांनी केली होती. उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांनी भूकंपग्रस्त भागातील पुनर्वसन झालेल्या लाभार्थींचे सर्व्हेक्षण करून परिपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधिताना दिले असून जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेवून त्वरित प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या प्रकरणी राज्यातील वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.

दरम्यान जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शासनाच्या संदर्भीय पत्र १७ फेब्रुवारी २०२० च्या अनुषंगाने उमरगा-लोहारा तालुक्यातील अ व ब वर्गवारीच्या गावांतील भूकंपग्रस्त लाभार्थींच्या घरांचे त्यांच्या वारसांच्या नावे हस्तांतरण करणे तसेच भूकंपग्रस्त लाभार्थी मृत्यू पावल्यानंतर त्या लाभार्थींच्या कायदेशीर वारसाच्या नावे वारसा हक्क नोंद मंजूर करणे या विषयीचे अधिकार २९ ऑगस्टस २०२२ च्या आदेशाद्वारे संबंधित ग्रामपंचायती प्रदान करण्यात आले आहेत.

तसेच या घरांचे इतर प्रकारे होणारे हस्तांतरण जसे वाटणीपत्र, विक्रीखत, बक्षिसपत्र, दानपत्र, गहाणखत विषयक हस्तांतरणाचे अधिकार तहसीलदार, उमरगा व लोहारा यांना प्रदान करण्यात आलेत व सदरील आदेश एक ऑक्टोबर २०२२ पासून लागू होतील, असे पत्रात नमूद केले आहे. एक ऑक्टोबर पूर्वीची अशा प्रकारे झालेली हस्तांतरणे नियमानुकूल करणे आवश्यक आहे. उमरगा व लोहारा तालुक्यातील “अ” व “ब” वर्गवारीच्या गावांतील १ ऑक्टोबर २०२२ पूर्वी विना परवाना झालेली हस्तांतरणे संक्षिप्त चौकशी करून नियमानुकूल करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेशाद्वारे प्रदान केले आहेत.

५२ गावांतील नागरिकांना मिळण्याची अपेक्षा
उमरगा तालुक्यातील ५२ गावातील भूकंपग्रस्तांना त्यांच्या मालकी हक्काचे कबाले लवकरच मिळतील अशी अपेक्षा लागली होती. कबाले मिळाल्यास भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, मालकी हक्क व इतर कामासाठी होणारी अडचण सुटण्यास मदत होणार आहे.

शिवाय बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटण्याची अपेक्षा तालुक्यात कलदेवलिंबाळा, बलसूर, समुद्राळ, कडदोरा, काळनिंबाला, सावळसूर, बाबळसूर, कवठा, माडज, व्हंताळ, एकुरगा, पेठसांगवी, नारंगवाडी, बेटजवळगा, नाईचाकूर, मातोळा, बोरी, कोराळ, येणेगूर गावांतील नागरिकांचे प्रश्न सुटणार असल्याने भूकंपग्रस्त लाभार्थ्यांतून समाधान व्यक्त करत होते.

बातम्या आणखी आहेत...