आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य धोक्यात:जळकोट येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर घाणीचे साम्राज्य

जळकोट20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर घाणीचे साम्राज्य पसरले असून रस्त्यावरच शौचास बसण्याचे लक्षणीय प्रमाण वाढले आहे. परिणामी दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

जळकोट मुख्य बाजारपेठ ते हत्तेनगर पार्वती कन्या प्रशाला, कुलस्वामिनी आश्रम शाळा, आलियाबाद व लोहगाव येथे जाण्यासाठी हा पर्यायी मुख्य रस्ता आहे. या वर्दळीच्या रस्त्यावर पशुवैद्यकीय दवाखाना व अधिकाऱ्यांचे निवासस्थान आहे. येथेच पहाटे व सायंकाळी अंधाराचा फायदा घेऊन नागरिक रस्त्यावर शौचास बसतात. बाजारपेठेतील आठवडी बाजारातील व्यापारी, नागरिक हे या शौचाच्या दुर्गंधीमुळे त्रस्त झाले आहेत. येत्या १५ जूनपासून शाळा सुरू झाल्यानंतर बाजुलाच असलेल्या जिल्हा परिषद कन्या शाळा, जिल्हा परिषद मुलांची शाळा व जिल्हा परिषद प्रशाला येथील विद्यार्थ्यांच्याही आरोग्यावर याचा घातक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवडी बाजाराच्या दिवशी याच रस्त्यावर भाजी विक्रेत्याला भाजीपाला विकावा लागत आहे.

ग्रामपंचायतीने प्रबोधन करावे
ग्रामपंचायतीने उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करावे. घरी बांधलेल्या शौचालयातच शौचासाठी बसावे, अशी समज द्यावी. गटारी व पावसाचे साचलेले पाणी जेसीबीने रस्ता करून काढून द्यावे.
-शिवाजी कदम, माजी पोलिस फौजदार.

कर भरूनही सुविधा नाही
ग्रामपंचायतीने कर भरूनही भाजीपाला विक्रीसाठी स्वच्छ जागा मिळत नाही. दिवसभर या घाणीच्या दुर्गंधीतच बसावे लागते.
-मनोहर जाधव, भाजीपाला व्यापारी.

बातम्या आणखी आहेत...