आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सध्याच्या युवकांची जबाबदारी महत्त्वाची; डोंजा येथे शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे यांचे आवाहन

डोंजा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांसद आदर्श ग्राम डोंजा घडवण्यात युवकांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे, असे मत शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे यांनी सिद्धार्थ ग्रुपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानातून मांडले.

डोंजा येथे सिध्दार्थ ग्रुपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास शासनाने परवानगी दिल्यामुळे एक वेगळाच उत्साह सगळीकडे पाहायला मिळाला. या वेळी अनंत सूर्यवंशी, तुकाराम पाटील, जयवंत पाटील, आजी-माजी फौजी आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ ग्रुप डोंजा यांनी शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यानाचे आयोजन करून एक वेगळाच समाज प्रबोधनाचा उत्साह निर्माण केला. सामाजिक क्रांती व संस्कृती यांचा सरळ संबंध असल्याचेही ते म्हणाले.

ग्रामप्रधान संस्कृती जोपासा
डोंज्यातील युवक जर त्यागमय जीवनास तयार होतील, तरच ग्रामप्रधान संस्कृतीतील दोषांचे निवारण करण्याचे सुचवलेले उपाय कार्यान्वित होऊ शकतील. तसे ते करू इच्छित असतील तर युवकांना त्यांच्या जीवनक्रमात आमूलाग्र बदल घडवून आणावा लागेल. “डोंज्यातील तरुणांनी खेड्यातील इतर भागातील युवकांना शिक्षित व संघटित करणे, तेथील जनतेशी निरोगी संबध निर्माण करण्यासारख्या प्रयत्नांवरच इतर आव्हाने पेलण्याची सक्षमता येऊ शकेल. डोंज्यातील तरुणांध्ये संघर्ष करण्याची भावना प्रज्वलित ठेवणे हे त्यांच्या प्रगतीतील महत्त्वाचे अस्त्र ठरू शकेल.

बातम्या आणखी आहेत...