आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे सुधारा:येरमाळा ते येडेश्वरी देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची झालीय दुरवस्था

कळंब8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव झाला आहे. येरमाळा ते येडेश्वरी मंदिराकडे जाणा-या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे अनवाणी पायानी येणाऱ्या भक्तांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी च्या देवस्थानाला ब वर्ग दर्जा मिळालेला आहे. तुळज़ापुर येथील तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणुन कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीची ओळख आहे. येरमाळा येथील येडेश्वरी देवी बाल घाट पर्वत रांगा मध्ये निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे येडेश्वरी देवीच्या वर्षातुन नारळीपौर्णिमा व चैत्र या दोन वेळी जत्रा असते. त्यामुळे मोठ्याप्रमाणात भाविक येरमाळा येथे दर्शनासाठी येत असतात. तसेच प्रत्येक आठवड्यामधील मंगळवारी व शुक्रवारी सुद्धा भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी येडेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव सुरु होणार असून , २६ सप्टेंबर रोजी घट स्थापनेस सुरुवात झाली आहे. या नवरात्र काळात उस्मानाबाद जिल्ह्यासह सोलापुर, बीड, येथील अनेक भाविक दर्शनासाठी येतात.

सध्या येडेश्वरीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहे, व रस्त्याच्या बाजुला पडलेली खडी ही रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे अनवाणी पायी येणाऱ्या भाविकांना नाहक त्रासाला समोरे जावे लागणार आहे. येडेश्वरी देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता हा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आहे. परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने खराब झालेल्या रस्त्याकडे साफ दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे भाविकातून नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाकडुन कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे. पावसाळयात अपघाताची शक्यता आहे.

ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने फक्त मुरूम टाकला मागील काही दिवसापुर्वी ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे तातडीने काही फक्त मुरुम टाकला आहे. विशेष म्हणजे मोठे दगडे असणारा मुरुम टाकला आहे. या मुरुमाची दबाई करण्याची गरज आहे.येडेश्वरी देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमान ते मंदिर या मध्ये साधारण तीन किमी चे अंतर आहे. या रस्त्यावर प्रत्येक वर्षी फक्त मुरुम टाकून डागडुजी करण्यात येते. या रस्त्याकरीता भरीव निधी उपलब्ध करून रस्ता बनवण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.