आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांची सोय:रामतीर्थकडे जाणारा रस्ता झुडुपे काढून सुरळीत ; रामभक्तांचे श्रमदान

नळदुर्ग6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६५ ओलांडून श्री क्षेत्र रामतीर्थकडे जाणाऱ्या रस्त्यावरील धोकादायक व अडचणीचे ठरणारे काटेरी झुडुपे व काही झाडे रामभक्तांनी २३ जुलै रोजी श्रमदान करून काढले आहे. यामुळे काटेरी झाडांचा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत झाला असून रामभक्तांची सोय झाली आहे.अलियाबद पुलाजवळून महामार्ग ओलांडून श्री क्षेत्र रामतीर्थकडे रामभक्तांना जावे लागते. महामार्ग ओलांडून जात असताना रामभक्तांना जीव मुठीत घेऊन जावे लागत होते. महामार्ग ओलांडून जात असताना महामार्गालगत व रामतीर्थकडे जाणाऱ्या रस्त्यालगत रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे-झुडुपे, लहान-मोठी झाडे मोठ्या प्रमाणात होती. परिणामी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी भरधाव वेगाने येणारी वाहने रामभक्तांना दिसत नव्हती. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

२१ जुलै रोजी या ठिकाणी मोठा अपघात होत होता. मात्र, चालकाच्या सतर्कतेने टळला. सध्या रामतीर्थ येथे दर शनिवारी सकाळी व गुरुवारी संध्याकाळी ५०० ते ६०० रामभक्त हनुमान चालीसा व सुंदरकांड पठणासाठी उपस्थित राहतात. रामतीर्थकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भक्तांसाठी धोकादायक ठरणारे व रस्त्यालगत असणारे काटेरी झाडेझुडुपे व लहान-मोठी झाडे रामभक्तांनी श्रमदान करून काढुन टाकले आहेत. यामुळे रामतीर्थकडे जाणारा रस्ता आता वाहतुकीसाठी सुरळीत झाला आहे. यावेळी नळदुर्ग, रामतीर्थ, लोहगाव व परिसरातील रामभक्तांनी श्रमदान केले.

दिशादर्शक फलक उभारा
महामार्ग ओलांडून रामतीर्थकडे जात असताना अपघात होऊ, नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने तत्काळ रामतीर्थकडे जाणाऱ्या रस्त्यावर महामार्गालगत दिशादर्शक फलक उभा करावा. तसेच महामार्गावरील भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांचा वेग या ठिकाणी कमी व्हावा, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रामभक्तांनी केली आहे. उपाययोजना केल्या नाहीत तर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचा इशारा रामभक्तांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...