आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउमरगा तालुक्यातील येणेगूर येथील कॅप्टन जोशी स्मारक माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात मंगळवार दि ३१ रोजी वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यानी प्रेक्षकाना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब बिराजदार हे होते तर परमहंस शिक्षण संस्थेचे सचिव बी. ए. बिराजदार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन येणेगूरचे प्रथम नागरिक सरपंच रेखाताई गुंजोटे, उपसरपंच विजय सोनकाटाळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप बिराजदार, प्रवीण कागे, लक्ष्मी पाटील, गुरुबाई बिराजदार, गौराबाई माळी, संतोष कलशेट्टी, गायत्री हिप्परगे, मुख्याध्यापक महेश हरके, संस्थेचे अध्यक्ष देवराज बिराजदार, यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. विविध कला गुणदर्शन कार्यक्रमांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यात माऊली माऊली, फॅन्सी डान्स,कोळीगीत, शिवबा बसला घोड्यावर असे अनेक कार्यक्रम झाले.
जयश्री सोमवंशी,नेहा चव्हाण, साक्षी घोरपडे, शरयू घोरपडे, विजय बनसोडे, साई बिराजदार, मेहरून शेख, स्नेहा संकटाळे,स्नेहा कागे, भक्ती जाधव, अल्फिया मुल्ला, हर्ष राजपूत, भावेश राजपूत, गायत्री स्वामी,किरण कवठे, प्रतीक्षा गायकवाड, सानिका वाडेकर, प्राजक्ता सुतके या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केले. प्रशालेतील इयत्ता दहावी व नववीच्या विद्यार्थिनी धानेश्वरी पाटील, रोहिणी धामशेट्टी, राजकन्या बनसोडे,स्वप्नाली माळकुंजे, अस्मिता तेली,श्रद्धा सोनकटाळे, आदिती कवठे,आर्या राजपूत या विद्यार्थ्यांनी बहारदार गाण्यांचे सूत्रसंचालन केले. दरम्यान नुतन ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख गोपाळ गेडाम व चंद्रकांत बिराजदार यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक शंकर हुळमजगे, आनंदराज बिराजदार,शिक्षक सौरभ उटगे, महेश खंडाळकर, प्रवीण स्वामी, सुरेश जाधव, महादेव बिराजदार, अविनाश दुनगे,गणेश जोजन,सिद्रामप्पा मुदकण्णा, कोमल कीर्तने, पार्वती जगताप, कालिंदी भाले, प्रदीप शिंदे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी हायटेक इंग्लिश स्कूल, जि प प्रशाला विद्यार्थी,गावातील व नळवाडी महालिंगरायवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक महिला उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.