आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान दिन:प्रयोगांतून विद्यार्थ्यांना उलगडले‎ विविध चमत्कारांमागील विज्ञान‎

धाराशिव‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाई उद्धवराव पाटील प्रशालेत राष्ट्रीय‎ विज्ञान दिनानिमित्त अंधश्रद्धा‎ निर्मूलनावर आधारीत चमत्कारामागील‎ विज्ञान व कायदेविषयक जनजागृती‎ कार्यक्रम घेण्यात आला.‎ चमत्कारामागील विज्ञान या‎ कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेच्या‎ मुख्याध्यापकांच्या हस्ते वात नसलेला‎ दिवा पाणी घालून प्रज्वलित करून‎ उद्घाटन करण्यात आले.‎ कार्यक्रमासाठी शाळेच्या‎ मुख्याध्यपिका नलावडे, अंधश्रद्धा‎ निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष अॅड.‎ अजय वाघाळे, अंनिस शहराध्यक्ष‎ सिद्धेश्वर बेलुरे, अंनिस जिल्हा प्रधान‎ सचिव वामनराव पांडगळे, ज्येष्ठ‎ साहित्यिक विजय गायकवाड यांची‎ उपस्थिती होती.

यावेळी‎ चमत्कारामागील विज्ञान प्रयोगाचे‎ सादरीकरण अॅड. अजय वाघाळे यांनी‎ केले. चमत्कारामागील विज्ञान व‎ त्यामागील अंधश्रद्धा या विषयी मुलांना‎ प्रबोधन करताना त्यांनी चमत्कारावर‎ आधारित विज्ञानाचे प्रयोग सादर केले.‎ त्यामध्ये साखळदंड तोडणे‎ यासहपाण्यावर दिवा पेटवणे, कलशामध्ये‎ वेगवेगळ्या नद्यांचे पाणी काढणे, प्रश्न‎ चिन्हावर ब्लेसिंग करणे, एका दिशेमध्ये‎ दोरी वळवणे, करणी भूत भानामती या‎ मागील अंधश्रद्धेविषयी प्रबोधन केले.‎ कार्यक्रमासाठी एम. बी. देशमुख, पी. के.‎ गाढवे, घेवारे, चौरे, कर्मचारी व विद्यार्थी‎ उपस्थित होते. प्रास्तविक नलावडे यांनी‎ तर आभार घोगरे यांनी मानले.‎

जादुटोण्यावर डॉ. अजय‎ वाघाळे यांनी दिली माहिती‎
जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ ची माहिती‎ सांगतांना अॅड. अजय वाघाळे म्हणाले की,‎ श्रद्धेच्या नावाखाली समाजामध्ये अंधश्रद्धा‎ पसरवणे, करणी, भूत, भानामती यांची भीती‎ दाखवून आर्थिक प्राप्ती करणे, शारीरिक मानसिक‎ व्याधीवर अघोरी उपचार करणे, साप, विंचू, कुत्रा‎ चावल्यास विष उतरवण्याचा दावा करणे,‎ गुप्तधनाच्या हव्यासापोटी नरबळी, पशुबळी देणे व‎ इतर अघोरी व अमानुष कृत्य करणे हे अंधश्रद्धा‎ निर्मूलन कायद्याने गुन्हा आहे. यात सात वर्षापर्यंत‎ शिक्षा व आर्थिक दंड आहे. जादूटोणा विरोधी‎ कायदा हा समाजाचे शोषण करणाऱ्या व्यक्तींना‎ प्रतिबंध करते, असे वाघाळे म्हणाले.‎

बातम्या आणखी आहेत...