आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवसायात प्रचंड उलाढाल:कोरोनाचे सावट हटले; गणेशोत्सवाला झळाळी

उस्मानाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संकटातील निर्बंध शिथिल केल्याने गणेशोत्सवाला झळाळी आली होती. भयमुक्त वातावरणात गणेशोत्सव जिल्हाभरात साजरा करण्यात आला.गतवर्षी राज्य सरकारच्या वतीने खबरदारी म्हणून लादण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात कायम होते. यामुळे दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी अडचणी होत्या. परिणामी गणेशोत्सवात उत्साह नव्हता. दरवर्षी गणेशोत्सवात फुले, गुलाल, शोभेच्या वस्तू, सजावटीचे साहित्य, प्रासादिक साहित्य, मंडप, कापड आदींच्या व्यवसायात प्रचंड उलाढाल होत असते.

गेल्यावर्षी अशी उलाढाल पाहण्यास मिळाली नाही. यावर्षी मात्र, पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर आली असल्याचे दिसून आले. नेहमीप्रमाणे जल्लोष कायम होता. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. सरकारनेही सर्व निर्बंध हटवल्यामुळे आनंदाचे वातावरण होते. सर्वच व्यवसायात चांगली उलाढाल पाहण्यास मिळाली तसेच पूर्वीप्रमाणे विविध खेळ, ढोल ताशांची पथके, लेझीम पथकांचाही जल्लाेष होता. गतवर्षीपेक्षा यावर्षी गणेशोत्सवातील वेगळेपण ठळकपणे जाणवत होत.

समाजाकडून स्वागत
गणेशोत्सवाचा मुस्लिम समाजातही उत्साह जाणवत होता. समाजातर्फे आझाद चौक व गांधीनगर येथे मिरवणुकांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपाधीक्षक कल्याणजी गेले, शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख, मसुद ईस्माईल शेख, खलिफा कुरेशी, आयाज शेख, अकबर पठाण, मुनीर कुरेशी, असद खान पठाण, ईस्माईल शेख, वाजिद पठाण, निजामोद्दीन मुजावर, मन्नान काझी, आतिक शेख, समियोद्दीन मशायक, अफरोज पिरजादे, जाकीर कुरेशी, सरफराज कुरेशी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...