आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतषबाजी:आकर्षक रांगोळीसह फुलांचा सडा टाकून केले दुसऱ्या मुलीचे स्वागत

तुळजापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मंगरूळ येथील पोलिसपाटील लक्ष्मण राजेंद्र माळी यांना दुसरी मुलगी झाली असून दुसऱ्या मुलीचे स्वागत माळी कुटुंबीयांनी वाजतगाजत केले. यावेळी रस्त्यावर आकर्षक रांगोळी काढून फुलांचा सडा घातला होता. मुलगी जन्माला आली म्हणून सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा होणारा छळ, मुलगी नकोशी म्हणून केला जाणारा तिरस्कार, मुलगाच हवा या अट्टटाहासापायी गर्भातच मुलींची होणारी हत्या या घटना समाजामध्ये नित्याचा झाल्या आहेत. मुलगाच हवा असा अट्टाहास करणारी अनेक कुटुंब आपण पहात असताना मंगरूळ येथील माळी परिवाराने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

शनिवारी (दि. २०) लक्ष्मण माळी यांचा दुसऱ्या मुलीचे वाजतृ-गाजत स्वागत करण्यात आले. मुलीला दवाखान्यातून गावात आणल्यानंतर स्त्री-जन्माचे मिरवणुकीने जंगी स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे माळी यांच्या पहिल्या मुलीचे सुध्दा जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. दरम्यान आकर्षक फुलांनी सजवलेल्या वाहनातून मुलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी बसस्थानक ते घरापर्यंत रांगोळी आणि रस्त्यावर फुले अंथरुन, वाद्यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिलेबीचे वाटप करण्यात आले. अनोख्या स्वागताचे मंगरूळ सह परिसरात कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...