आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकारी पीक विमा कंपनीने सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला कोलदांडा घातला असून दोनदा मुदत देऊनही कंपनीने पंचनाम्यांच्या प्रती कृषी विभागाला सुपूर्त केल्याच नाहीत. याबाबत वरिष्ठ स्तरावर कंपनीची बैठकच झाली नाही. त्यामुळे पंचनामे देण्याचे ठरले नसल्याचे कर्मचारी सांगत आहेत. दरम्यान, कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांच्या तक्रारींचा पाऊस पडत आहे. येथे येणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष दिसत असून ते कार्यालयात कर्मचाऱ्यांसोबत वाद घालत आहेत.
खरीप २०२२ च्या पीकविम्याचे वितरण काही दिवसांपूर्वी करण्यात आले. जिल्ह्यातील पूर्वसूचना दिलेल्या पाच लाख ८८ हजार ५७४ शेतकऱ्यांपैकी दोन लाख ८१ हजार ५८२ शेतकऱ्यांना २५४ कोटी ९३ लाख रुपये विमा वितरीत करण्यात आला. तीन लाख सहा हजार ९९२ शेतकऱ्यांना अद्याप काहीच रक्कम देण्यात आलेली नाही. तसेच यातीलच १ लाख ५१ हजार ४७७ शेतकऱ्यांच्या पूर्वसूचनाच नाकारण्यात आल्या आहेत. विमा देण्यातही प्रचंड गोंधळ असून शेतकऱ्यांना दिलेल्या
पंचनामे प्रक्रियेमध्ये गोंधळ पंचनामे करतानाच गोंधळ झाला आहे. विमा कंपनीने त्रयस्थ कंपनीला पंचनामे करण्याचे कंत्राट दिले होते. त्यांनी शेतीचे ज्ञान नसलेल्या दहावी, बारावी नापास “ढ’ व्यक्तींना पंचनाम्यासाठी नियुक्त केले. त्यांनी मित्रांवर याची जबाबदारी सोपवली. यामुळे पंचनाम्यात गोंधळ झाला. ते निस्तारून पंचनामे प्रशासनाला देणे कंपनीला जड चालले.
कंपनीच्या कार्यालयात गर्दी कंपनीच्या कार्यालयात तक्रारी दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होत आहे. तक्रार घेणाऱ्या कर्मचाऱ्याला रजिस्टरवर अनुक्रमांक टाकण्याची वेळ मिळाली नाही. विमा न मिळाल्यामुळे प्रचंड वैतागले आहेत. विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. यामुळे कार्यालयात प्रचंड वाद होत आहेत.
विनाकारण पूर्वसूचना रिजेक्ट माझ्या शेतातील साेयाबीनमध्ये गुडघाभर पाणी होते. त्यात उभारून मी सर्व प्रक्रिया करून पूर्वसूचना दिली. तरीही माझी पूर्वसूचनाच वगळण्यात आली. दिपक परदेशी, तक्रारदार शेतकरी, कोंड.
मला का वगळले ? रितसर पूर्वसूचना मेलवर पाठवली. तरी विमा मिळाला नाही. आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना विमा मिळाला. यातून मला वगळले, याचे उत्तर काेणत देत नाही. आप्पासाहेब धनके, शेतकरी, सकणेवाडी
पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी {नुकसानीच्या तुलनेत मिळालेली पीकविम्याची रक्कम तोकडी. {एकच बांध असलेल्या दोन शेतकऱ्यांना दिलेल्या पीकविमा रकमेत प्रचंड तफावत. {पंचनामा झाला, पूर्वसूचना दिली, कंपनीने संमती दिली तरीही शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळालीच नाही. {शेतकऱ्यांनी पीक नुकसानीचा लाइव्ह फोटो काढला, मुदतीत योग्य प्रक्रिया केली. तरीही कंपनीकडून पूर्वसूचना रिजेक्ट. {पीकविमा कंपनीने पंचनामाच केला नाही, तरीही कमी नुकसान दाखवून तोकडी रक्कम दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.