आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गुवाहाटीला गेलेल्या आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांना आता परंड्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळू लागला आहे. परंड्याचे सेनेचे तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव यांच्यासह झेडपीचे माजी सभापती दत्ता साळुंके,युवा सेनेचे तालुकाप्रमुख राहूल डोके यांनी पत्र काढून डॉ.सावंत यांच्या भूमिकेला जाहीर पाठींबा व्यक्त केला आहे.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव यांनी म्हटले आहे की, सर्व शिवसेना तालुका पदाधिकारी व शिवसैनिक आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतलेल्या निर्णयाशी सहमत आहोत. मागील अडीच वर्षे विकासकामे किंवा निधी आणण्यासाठी बरेच प्रयत्न करून सुध्दा निधी मिळाला नाही. कारण महत्त्वाचे ग्रामविकास खाते राष्ट्रवादीकडे असल्याने आम्हाला जाणीवपूर्वक डावलण्यात आले. त्यामुळे सर्व पदाधिकारी नाराज होते.परंतु पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे या बाबीची वाच्यता कुठेही करता येत नव्हती.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी आम्हा शिवसैनिकांची अवस्था होती.राष्ट्रवादीचा गावपातळीवरचा कार्यकर्ता सुध्दा त्यांच्या मंत्र्यांकडुन ५० लाखांची विकासकामे आणत होते. परंतु आम्हांला विकास कामांसाठी निधी मिळत नव्हता. येणाऱ्या आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रवादी, काँग्रेस विरोधात लढायच्या आहेत.त्यामुळे महाविकास आघाडीमधून बाहेर पडणे हा निर्णय योग्यच आहे.आ.सावंत यांनी किंवा आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला नाही किंवा सोडणार नाही. हे बंड शिवसेनाविरोधात नसून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस विरोधात आहे. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय साळुंके यांनी म्हटले आहे की,मागील अडीच वर्षे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस व काँग्रेसकडून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न चालु आहे. मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे असल्यामुळे काही बोलताही येत नव्हते. आ.प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी जो निर्णय घेतला तो योग्यच आहे. युवासेना तालुकाप्रमुख तथा कंडारीचे उपसरंपच राहुल डोके म्हटले आहे की, मी व तालुक्यातील सर्व युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वजण आ.तानाजीराव सावंत यांनी जो निर्णय घेतला आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत.
गेली अडीच वर्षे पालकमंत्री म्हणून शंकरराव गडाख यांची नियुक्ती झाली होती परंतु अद्याप कोणत्याही शिवसैनिकाला कसल्याही प्रकारचा निधी मिळाला नाही.निधी मागणीसाठी गेलो असता वारंवार हेच सांगितले जात होते की, निधी आल्यावर देवू. परंतु आम्ही चौकशी केली असता संपूर्ण निधी राष्ट्रवादी व काँग्रेस तसेच कमिशन घेऊन इतरांना दिल्याचे समजले.
दाबण्याचा प्रयत्न
दाबण्याचा प्रयत्न चालु आहे. मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे असल्याने बोलताही येत नव्हते. आ. प्रा. डॉ.तानाजी सावंत यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. युवासेना तालुकाप्रमुख राहुल डोके म्हणाले आहे की, मी व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते डॉ. सावंत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.